Akola Drowned News
Akola Drowned News Saam Tv
महाराष्ट्र

खळबळ! मामा भाचा डोहात पुन्हा आढळला मृतदेह; २ दिवसांपूर्वीच...

Santosh Kanmuse

अकोला: अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या वारी हनुमान येथील मामा भाचाच्या डोहात पुन्हा एकदा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे. मामा भाचाच्या डोहात आतापर्यंत अनेकांचा बुडून मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे हा डोह मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. आज पुन्हा एकदा या डोहात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

वारी येथील मामा-भाचा डोहात एकाच आठवड्यात दुसरा बळी गेला आहे. आज एक अनोळखी मृतदेह तरंगताना दिसला, या मृतकाने लाल रंगाचे कपडे घातलेले आहेत. वारीचे सरपंच शिवाजी पतींगे यांनी हिवरखेड पोलिसांना कळविल्यानंतर हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दोन तीन दिवसांपूर्वीच अकोला येथील राज गुढधे नामक युवक याच डोहात बुडून मृत्यू (Death) पावला होता. दरम्यान या डोहातील खड्डे बुजविण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून करण्यात आली आहे.

हे देखील पाहा

दोन दिवसापूर्वी आढळला होता तरुणाचा मृतदेह

दोन दिवसापूर्वी अकोल्यातील युवक वारी हनुमान येथे दर्शनासाठी गेले होते. यातील काही मित्र मंदिराकडे होते. तर काही मामा भाच्याच्या डोहाकडे अंघोळ करण्यासाठी गेले. यात एका युवकाचा डोहात बुडून मृत्‍यू (Death) झाल्‍याची घटना समोर आली होती.

मित्रांनी आरडाओरड केली तेव्हा आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सदर युवक बुडाला होता. याबाबत वारी येथील सरपंच शिवा पतींगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन याबाबत हिवरखेड पोलिसांना (Police) माहिती दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचं 'पानीपत'; IPLमधील कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

SCROLL FOR NEXT