बहिणीला दारु पिऊन त्रास देतो म्हणून मेहूण्याने काढला दाजीचा काटा
बहिणीला दारु पिऊन त्रास देतो म्हणून मेहूण्याने काढला दाजीचा काटा Saam Tv
महाराष्ट्र

बहिणीला दारु पिऊन त्रास देतो म्हणून मेहूण्याने काढला दाजीचा काटा

साम टिव्ही ब्युरो

अविनाश कानडजे

औरंगाबाद: बहिणीला त्रास देतो म्हणून बायकोच्या भावाने आपल्या दाजीचा काटा काढला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad) कन्नड तालुक्यामधील नेवपूर येथे एका अनोळखी इसमाचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. दहा दिवसानंतर या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. कडुबा विठ्ठल सोळुंके असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, नेवपुर येथील पूर्णा नेवपुर मध्यम प्रकल्पाच्या मुख्य गेटजवळ 30 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता.

या तरुणाचा गळा आवळून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मात्र खुनातील तरुणाची ओळख न पटल्याने तरुणाची ओळख पटवून आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. मृताच्या दाढीला टाके आणि पायाला टाके पडलेले होते, त्यावरून एका बाईने मृताची ओळख पोलिसांना सांगितली. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन विचारपूस केली असता.

मृत कडुबा हा त्याच्या पत्नीला दारू पिऊन नेहमी त्रास देत होता, म्हणून मेहूण्याने आपल्या मेहुण्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मृत कडुबा यांचा साला सोमीनाथ खांदवे याला अटक केली आहे. परंतु, आपला पति दहा दिवसापासून बेपत्ता आहे. तर पत्नीने पोलिसात तक्रार का केली नाही? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या खुणा मध्ये अजून कोणी सामील आहे का याचा शोध पोलिस लागतीलच. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि पिशोर पोलीसांनी संयुक्तरीत्या केली आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय आहेर हे करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Court Raps Ed: खटल्याला उशीर झाला, आरोपींनी अधिकची शिक्षा भोगली, ईडीला कोर्टाने फटकारलं

Madha Constituency: झुकणार नाही लढणार! निवडणुकीनंतर अनेक गोष्टींना तोंड देण्याची माझी तयारी; धैर्यशील मोहिते पाटलांचे फडणवीसांना प्रतिआव्हान

Bhabha Hospital News : पेशंटकडून नर्सला मारहाण, कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन

Panchayat 3 Released Date : अखेर ठरलं..., 'पंचायत ३' याच महिन्यात रिलीज होणार; कहाणीत कोणता नवा ट्वीस्ट येणार ?

Today's Marathi News Live : राणे-तटकरेंचा पराभव करण्यासाठी ठाकरे पितापुत्र कोकणात

SCROLL FOR NEXT