archer pravin jadhav family  
महाराष्ट्र

ऑलिम्पियन प्रवीणचे कुटुंब भावविवश; गाव साेडून जाण्याचा निर्धार

ओंकार कदम

सातारा : साधं घर बांधायचे झाले तर लाेक आडवी येताहेत. मान सन्मानापेक्षा घर महत्वाचं आहे. सारखं सारखं त्रास भाेगण्यापेक्षा गाव साेडून गेलेलं बरं अशी भावना ऑलिम्पिकपटू प्रवीण जाधव याच्या वडिलांची झालेली आहे. सरडे (ता. फलटण) येथे झाेपडीत राहणा-या प्रवीण जाधव याच्या कुटुंबियांना घर बांधकाम करण्यात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. त्याविषयी बाेलतना त्याचे वडील रमेश एकनाथ जाधव हे भावविवश झाले आणि गाव साेडण्याचा निर्धार व्यक्त केला. (olympian-archer-pravin-jadhav-family-says-will-leave-sarde-village-sml80)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उज्जवल करणाऱ्या प्रवीण रमेश जाधव यांच्या कुटुंबाला स्थानिक जागेच्या वादातून त्रास दिला जात आहे. पिढ्यान पिढ्या ज्या जागेवर त्यांनी छोट्याशा झोपडीत वास्तव्य केले. ज्या खडतर परिस्थितीमध्ये प्रवीण सारखा हिरा देशाला दिला, त्या झोपडीमधून जरा चांगले दिवस आल्याने घर बांधकाम करण्यासाठी जेव्हा सुरवात केली तेव्हा मात्र गावातीलच एका समाजातील कुटुंबातील काही सदस्यांनी प्रवीणच्या कुटुंबास archer pravin jadhav family बांधकाम करण्याचा विरोध करून दमदाटी करण्यास सुरुवात केली आहे.

प्रशासनाने संबंधितांना समजावून सांगून सुद्धा पुन्हा पुन्हा तोच प्रकार घडत असल्याने त्रासलेल्या प्रवीणच्या कुटुंबाने हा प्रश्न कायमचा सोडवावा अन्यथा आम्ही गाव सोडून जातो असा पवित्रा घेतला आहे. प्रवीणचे वडील रमेश एकनाथ जाधव म्हणाले माझे आई वडील शेती महामंडळात कार्यरत हाेते. शेती महामंडळाने माझ्या कुटुंबियांचे फंड सर्व्हिस न दिल्याने त्यांनी आम्हांला घरानजीक जमीन माेजून दिली. परंतु त्या जागेच्या शेजारी राहणारे आम्हांला त्रास देताहेत. काेणत्याही प्रकारे सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे आता आम्हांला गाव साेडण्या शिवाय पर्याय राहिला नाही.

प्रवीणने खेळात देशाचे नाव आणखी मोठं करावं यासाठी सध्याच्या परिस्थितीत गावाने त्याच्या कुटुंबियाच्या पाठीशी उभं राहणे गरजेचे बनले आहे.

एकीकडे प्रवीण जगाच्या नकाशावर आपल्या देशा बरोबरच गावचे नाव कोरण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असताना दुसरीकडे गावामध्ये शेजारच्या लोकांनीच प्रवीणच्या कुटुंबाला दिलेला त्रास म्हणजे एक प्रकारे दुर्दैवच म्हणावे लागेल. ऑलिम्पिकवीराच्या कुटुंबियांवर गावातच पोरकं होण्याची वेळ येतेच का ? असा संतप्त सवाल आता लोक विचारू लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP MLA Video: खांद्यावर kiss केलं नंतर दातात कान पकडला! भाजप आमदाराच्या व्हिडिओनं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: कोथरुडमध्ये १००० हून अधिक नवजात बालकांचा बालदिन सोहळा

मनसेचा छटपूजेला विरोध, मात्र पक्षाच्याच नगरसेविकेकडून आयोजन|VIDEO

Women Sweat Attraction: महिलांच्या घामाच्या वासामुळे पुरुष आकर्षित होतात? संशोधनातून काय समोर आलं?

Green Lake Trek : चार वर्षांनंतर ‘ग्रीन लेक ट्रेक’ पुन्हा सुरू; हिमालयाच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्याची पर्यटकांना संधी

SCROLL FOR NEXT