सातारा : टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले कसब दाखवणाऱ्या भारतीय तिरंदाज प्रवीण जाधव Archer Pravin Jadhav यांच्या कुटुंबाला धमक्या दिल्याची घटना समाेर आली आहे. धमकाविणारे दूसरे तिसरे काेणीही नसून त्याचे सख्खे शेजारीच असल्याची प्राथमिक माहिती पुढं येत आहे. जाधव यांच्या कुटुंबाला त्यांच्या झाेपडीवजा घराची दुरुस्ती करु नये यासाठी धमकी मिळत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पाेलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी जाधव कुटुंबियांना काेणत्याही प्रकारे त्रास हाेणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासित केले आहे. (anxious-calls-from-threatened-parents-archer-pravin-jadhav-on-return-from-tokyo-olympics-sml80)
प्रवीणने Pravin Jadhav टोकियो ऑलिम्पिकमध्ये tokyo olympics आपले ज्येष्ठ सहकारी अतनू दास आणि तरुणदीप राय यांचे स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर चमकदार कामगिरी केली हाेती. त्याला दीपिका कुमारीसह मिश्र दुहेरीत उतरवण्यात आले, पण तो शेवटच्या आठमधून बाहेर पडला. परंतु त्याने ऑलिम्पिकमध्ये लक्षवेधक कामगिरी करीत देशातील युवा पिढीपुढं आदर्श निर्माण केला. त्याच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुकही झाले. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील त्याच्या गाव सरडे हे जागतिक स्तरावर पाेहचले. परंतु त्याचे यश कदाचित त्याच्या शेजाऱ्यांना रुचले नाही असे येत्या काही दिवसांत घडलेल्या घटनामाेडींवर दिसून येत आहे.
प्रवीणच्या कुटुंबियांना धमकी
प्रवीणचे कुटुंब पुर्वी झोपडीत रहायाचे. त्याने सैन्यात भरती झाल्यानंतर घर बांधले. या ठिकाणच्या जागेवरुन त्याच्या कुटुंबियांना यापुर्वी देखील काही लाेकांनी त्रास दिल्याचे प्रवीण सांगताे. काही दिवसांपुर्वी घडलेल्या घटनेबाबत त्याने पीटीआयला सांगितले एका कुटुंबातील पाच ते सहा लोक आले आणि त्यांनी माझे आई -वडील, काका आणि काकूंना धमकावण्यास सुरुवात केली. आम्हांला आमचे घर दुरुस्त करायचे आहे. परंतु ते करुन देत नाहीत.
संबंधितांना आमच्या जागेपासून एक वेगळी लेन हवी होती, ज्याला आम्ही सहमती दिली, पण आता ते संपूर्ण सीमा रेषा ओलांडत आहेत. ते आम्हांला घर दुरुस्त करण्यापासून कसे रोखू शकतात? आम्ही त्या घरात वर्षानुवर्षे राहत आहोत आणि आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत.
सध्या माझे कुटुंब अस्वस्थ आहे आणि मीही तिथे नाही. मी लष्कराच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले आहे आणि ते त्याकडे १०० टक्के लक्ष देत आहेत. सातारा जिल्ह्याचे पाेलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी देखील माझ्या कुटुंबाला पूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे.
टोकियो ऑलिम्पिकहून परतल्यानंतर भारतीय दल थेट हरियाणातील सोनीपत येथे गेला आहे. जिथे पुढील महिन्यात हाेणा-या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे प्रशिक्षण शिबिर होत आहे. बुधवारी (ता. ४) त्यासाठीच्या नवीन चाचण्या होणार आहेत. सध्या प्रवीण देखील तेथेच आहे, परंतु त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी लागली आहे.
कायदेशीररित्या मदत देऊ : अजयकुमार बन्सल
"आम्हाला कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. जमिनीचा वाद आहे. कर्नल यांच्या कॉलच्या आधारे, मी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थानिक पाेलिसांना कळवले आहे. निश्चितपणे त्यांना सर्व प्रकारची मदत कायदेशीररित्या मिळेल," असे बन्सल यांनी पीटीआयला सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.