Bacchu kadu  Saam Tv
महाराष्ट्र

Kunbi Certificate: कुणबी प्रमाणपत्रासाठी देवस्थानामधील जुने पुरावे राहतील ग्राह्य : बच्चू कडू

Maratha Reservation: मराठवाड्यात कोतवाल बुक आणि जन्मनोंदी सापडण्यास अडचणी येतात, त्याचे शोधकाम सुरु आहे. याचबरोबर सगे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देणे आणि विविध देवास्थानांकडे असलेले जुने पुरावे ग्राह्य धरण्यासाठी तीन शासन निर्णय काढण्यात येणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले.

डॉ. माधव सावरगावे

Kunbi Certificate :

राज्यात ५४ लाख तर मराठवाड्यात तब्बल ३१ हजार कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यापैकी विभागात १४ हजार कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरीत केले आहेत. आढळलेल्या नोंदीतून अधिकाधिक लोकांना प्रमाणपत्र मिळावे यासाठी १७ आणि १८ जानेवारी दरम्यान गावागावात दवंडी पिटवली जाणार आहे.(Latest News)

ग्रामपंचायतीत याद्या लावून, अर्ज भरवून घेतले जाणार आहेत. दुसरीकडे अर्धवट नावांच्या नोंदी सापडलेल्यांच्या वंशावळी शोधण्यासाठी तसेच सगे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देणे आणि विविध देवास्थानांकडे असलेले जुने पुरावे ग्राह्य धरण्यासाठी तीन शासन निर्णय काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आतापर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदी ग्राह्य धरून त्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरंगे यांनी केली आहे. अनेक जुन्या पुराव्यात अर्धवट नोंदी आहेत, अशा लोकांच्या वंशावळी शोधणे तसेच पुर्वीच्या काळी विविध देवस्थान, पुजारी यांच्याकडे असलेली माहिती ग्राह्य धरण्यासाठी लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल. मराठवाड्यात कोतवाल बुक आणि जन्मनोंदी सापडण्यास अडचणी येतात, त्याचे शोधकाम सुरु आहे.

२० जानेवारीच्या आत कुणबी प्रमाणपत्र सापडलेल्यांना कुणबी विशेष बाब प्रमाणपत्र द्या,अन्यथा राज्य सरकारच्या नवीन जीआरचा काहीही फायदा होणार नाही,संपूर्ण राज्यातील नोंद सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या. त्यांनी जो मसुदा आणला यावर आमचे अभ्यासक,तज्ञ बोलावून चर्चा करतो.या मसुद्यात काही सुधारणा देखील सांगितल्या आहेत.जर ५४ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले तरच या मसुद्याचा फायदा होणार आहे. जर ५४ लाख लोकांना प्रमाणपत्र दिले त्यांच्या नातेवाईकांना २० तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या तरच आमचा हेतू सफल होईल, असं बच्चू कडू म्हणाले.

अशी आहे परिस्थिती

जिल्हा तपासलेल्या नोंदी कुणबींची संख्या कुणबी प्रमाणपत्र वितरण

छ. संभाजीनगर २९७८२६३ ४४७४ १५१३

जालना २१६०६१५ ३३१८ १७७८

परभणी २१२८१४१ २८९१ १८७९

हिंगोली १४७०७१२ ३५१३ ५५

नांदेड २५९०१६८ १७४८ १२७

बीड २३८१५५३ १३१२८ ६३८७

लातूर २३६४८७४ ९०१ ११९

धाराशिव ४२०९०२२ १६०३ २२९०

एकूण २०२८३३४८ ३१५७६ १४१४८

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT