Buldhana News
Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

नळगंगा धरण प्रकल्पावर अधिकाऱ्याची परिवारासह सैर; दुर्घटना घडल्यास जवाबदारी कुणाची...?

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana News : बुलढाण्यातील (Buldhana) सर्वात मोठा असलेला नळगंगा प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रात म्हणजेच प्रकल्पाच्या भिंतीवर व गेट वर काही अधिकारी आपल्या परिवारासह काल बिनधास्तपणे फिरताना आढळून आले. इतकच नाही तर प्रकल्पाच्या भिंतीवर अधिकाऱ्यांच्या बाईक्स व वाहने सुद्धा नेण्यात आली जिथे सामान्यांना जाण्यास मज्जाव आहे.

इतकच काय तर अधिकाऱ्यांच्या परिवारातील सदस्यांना प्रकल्पाचे गेट उघडून पाण्याचा विसर्ग कसा करतात हे दाखविण्यात आल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. गुजरातमधील मोरबीची घटना ताजी असताना अशाप्रकारे एखाद्या मोठ्या धरणाचे दरवाजे बिना परवानगी उघडणे कितीपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित राहत आहे.

बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील नळगंगा प्रकल्पावर आपल्या परिवारासह पिकनिक करायला आले होते. सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.पी.पाटील. आपल्या मुलांबळांसह ते धरणाच्या अतिशय संवेदनशील व प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रांत म्हणजे धरणाच्या भिंतीवर व गेट वर अगदी मुक्त संचार करत होते. आपल्या परिवारातील सदस्यांना धरणाचे दरवाजे कसे उघडतात , कसा पाण्याचा विसर्ग केला जातो हे दरवाजा उघडून दाखवण्यात आले. इतकंच काय तर आपल्या मुलींना धरणाच्या भिंतीवर बाईक राईडचा आनंद ही घेऊ दिला.

खरं तर हे सिंचन विभागाचे अधिकारी असूनही इतके बेजवाबदारीने कसे वागू शकतात असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.मात्र त्याना विचारणा केली असता त्यांनी परिवारासह गेलो नव्हतो तर धरणाच्या गेटच मेंटेनन्स कार्याला गेलो होतो अस बेजबाबदार उत्तर दिलं आहे. कुठल्याही धरणाचे गेट हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवनवगी शिवाय व धरणाखालील गावाना सूचना देऊन उघडली जातात मात्र काल बिना परवानगी गेट उघण्यात आलं..याला जवाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs SRH: मुंबईने हैदराबादचं वादळ रोखलं! पलटणला जिंकण्यासाठी १७४ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live: सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सभा

Maharashtra Politics : ...मग बघू कोणाची हिंमत होते; 'नोकरीत मराठी माणूस नको' पोस्टनंतर मनसे आक्रमक

Mumbai News: नायर रुग्णालयाच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या, धक्कादायक VIDEO आला समोर

Janhvi Kapoor : परम सुंदरी; जान्हवी कपूरच्या सौंदर्यावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या...

SCROLL FOR NEXT