Cm Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: CM एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

CM Eknath Shinde: ठाकरे गटाचे अंधेरीतील कार्यकर्ते हेमंत पालव यांच्यावर अंधेरी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

Ruchika Jadhav

Political News:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे अंधेरीतील कार्यकर्ते हेमंत पालव यांच्यावर अंधेरी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शनिवारी रात्री उशिरा शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते अंधेरी एमआयडीसी पोलीस स्थानकात जमले होते. पालव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात मुंब्रा्यातील शाखेवरून मोठा वाद पेटला आहे. ११ नोव्हेंबर रोजी मुंब्रा येथे दोन्ही गटांत हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शाखेला भेट देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या विनंतीमुळे त्यांनी शाखेजवळ जाणे टाळले होते. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती.

"मुंब्रा्यात फुसका बार आला आणि वाजलाच नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा इतका आवाज होता की त्यांना यू टर्न घ्यावा लागला.", अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. यावरून ठाकरे गटाच्या कार्यकत्यांकडून अक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पालव यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water After Tea : चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिता? सावधान! होतात 'या' ३ गंभीर समस्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवरील कारवाईच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, दिल्लीतील वातावरण तापले

5 Potato Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल रेसिपी! बटाट्यापासून बनवा 5 उपवासाचे पदार्थ

Hair Fall: केसगळती आणि केस तुटण्याची समस्या होईल कमी; आठवड्यातून २ वेळा लावा हे घरी बनवा खास तेल

SCROLL FOR NEXT