obc samaj demands mla sandeep kshirsagar to cancel gr of maratha reservation saam tv
महाराष्ट्र

Beed OBC Samaj Andolan : सगेसोयरेचा मसुदा रद्द करा... बीड शहरात ओबीसी समाजाचा आमदार संदीप क्षीरसागरांना घेराव

सरकारने जारी केलेला सगे सोयऱ्यांचा मसुदा तात्काळ रद्द करण्यात यावा, ही मागणी घेऊन बीड शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सकल ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.

विनोद जिरे

Beed News :

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश (maratha reservation gr) रद्द करा अशी मागणी करत आज (गुरुवार) बीड शहरात आमदार संदीप क्षीरसागर (mla sandeep kshirsagar) यांना सकल ओबीसी समाजाने घेराव घातला. त्यावेळी आमदार क्षीरसागर यांनी ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांशी, पदाधिका-यांशी चर्चा केली. त्यानंतर सकल ओबीसी समाजाच्या वतीने आमदार क्षीरसगार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (Maharashtra News)

सरकारने जारी केलेला सगे सोयऱ्यांचा मसुदा तात्काळ रद्द करण्यात यावा, ही मागणी घेऊन बीड शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सकल ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्यावर टीका करणाऱ्या महायुती मधील आमदारांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, अन्यथा 2024 मध्ये ओबीसी काय करू शकते ? हे मतामधून दाखवून देऊ असा इशारा ओबीसीचे नेते सुभाष राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान बीड शहरात आमदार संदीप क्षीरसागर यांना घेराव घालत सकल ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलेे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांच्यासह तालुक्यातील सर्वचं तहसीलदारांना सकल ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देत मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश रद्द करा अशी मागणी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT