obc news Saam tv
महाराष्ट्र

OBC क्रिमीलेअरची मर्यादा 15 लाख? राज्य सरकारचा केंद्राकडे नवा प्रस्ताव

obc news : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता राज्य सरकारने ओबीसी समाजासाठी मोठा निर्णय घेतलाय. महसूलमंत्री बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसमितीच्या बैठकीत ओबीसींसाठी कोणते निर्णय घेण्यात आलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटलेलं असताना आता राज्य सरकारनं ओबीसींसाठी मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील ओबीसी समुदायासाठी नॉन क्रिमीलेअरच्या मर्यादेत 15 लाखांपर्यंत वाढ करण्याची शिफारस करण्यात आलीये. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेच्या अध्यक्षतेखाली उपसमितीच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेण्यात आलाय पाहूयात....

नॉन क्रिमीलेअर मर्यादा वाढणार?

नॉन-क्रिमीलेअरची मर्यादा 8 लाखांवरून थेट 15 लाख करण्याची शिफारस

केंद्राच्या OBC यादीत 43 अतिरिक्त जाती समाविष्ट करण्याचा प्रस्ताव

पात्र लाभार्थ्यांनाच जात प्रमाणपत्रं देण्यासाठी विशेष पडताळणी मोहिमेचे आदेश

OBC विद्यार्थ्यांसाठी 10 जिल्ह्यांमध्ये नवी वसतिगृहं आणि कार्यालयं उभारणार

नावातील चुकांमुळे प्रलंबित असलेले 27 ते 32 जातींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार

राज्य सरकारनं फक्त शिफारस करून होणार नाही. तर केंद्राकडे पाठपुरावा करून ही मर्यादा पंधरा ऐवजी 20 लाखांपर्यंत करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केलीये.

दरम्यान, ओबीसींच्या नॉन क्रिमीलेयर मर्यादावाढीच्या सरकारच्या निर्णयानं दोन कोटी ओबीसी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याचंही ओबीसी नेत्यांनी म्हटलंय. मात्र केंद्र सरकार याबाबत काय भूमिका घेणार याकडे राज्यातल्या ओबीसी समाजाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rabdi Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली? घरीच बनवा मलाईदार आणि स्वादिष्ट रबडी; वाचा सोपी रेसिपी

Tharla tar Mag: 'ठरलं तर मग' मालिकेत सर्वात मोठा ट्विस्ट! ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक

Diet : तंदुरुस्त राहण्यासाठी फॉलो करा 'प्लांट बेस डाएट', शरीरात होतील 'हे' ६ फायदे

Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर; शित्रणमंत्रालयाची सूत्रे आता या दिग्गज नेत्याकडे

Pune Tourism : पुण्याचं विहंगम दृश्य पाहायचंय? मग 'हे' ठिकाण रिमझिम पावसात नक्की फिरा

SCROLL FOR NEXT