जरांगे पाटलांच्या कुणबी दाखल्यांच्या मागणीला आव्हान देण्यासाठी ओबीसींनी लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चाचं आयोजन केलं..मात्र पुण्यातील पाटस टोल नाक्यापासून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी पुण्यातच अडवलं.... यावेळी ओबीसी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्यानं काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं...
पोलिसांनी रोखून धरल्यानंतरही लक्ष्मण हाकेंनी आंदोलनावर ठाम राहत... गोळ्या घातल्या तरी आता माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्राच हाकेंनी घेतला...पुणे पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही ओबीसी आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले...यामुळे पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प झाला. तब्बल तासभर चाललेल्या य़ा ठिय्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यानंतर पोलिसांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आंदोलकांना पाच किलोमीटरपर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी दिली. त्यानंतर आंदोलकांनी कुच केली खरी. मात्र पाच किलोमीटरनंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखलं. त्यामुळे आंदोलकांनी थेट रस्त्यावरच बसून ठिय्या मांडला आणि तिथेच जेवणही उरकले.
जरांगेंच्या मागण्यांविरोधात आंदोलनावरून ओबीसी संघटनांमधील मतभेदही चव्हाट्यावर आलाय...एकीकडे ओबीसींच्या हक्कासाठी हाके आंदोलनावर ठाम असताना दुसरीकडे हाकेंच्या आंदोलनाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पाठिंबा नसल्याची भूमिका अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी मांडलीय. मुळात मराठा आंदोलकांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांकडे अर्ज केल्यानंतर ओबीसी आंदोलकांनीही आझाद मैदानावर आंदोलनाची हाक दिली होती....मात्र दोघांना पोलिसांनी परवानगी नाकारली... त्यामुळे जरांगेंनी अंतरवालीत आमरण उपोषण सुरु केलं...तर हाकेंनी मुंबईच्या दिशेनं कूच करण्याचा प्रयत्न केलाय.. आता ओबीसी आंदोलक मागे हटणार की मुंबई गाठणारच याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.