OBC Leader Babanrao Taywade Saam tv news
महाराष्ट्र

'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही' १२ मागण्या मान्य, मंत्र्याची ग्वाही; तायवाडेंनी पाणी पिऊन उपोषण सोडलं

OBC Leader Babanrao Taywade: बबनराव तायवाडे यांचे उपोषण सहा दिवस चालले. सरकारने ओबीसी आरक्षण सुरक्षित राहील, अशी ग्वाही दिली. मंत्री अतुल सावे यांनी मागण्यांवर तातडीने निर्णय जाहीर केला.

Bhagyashree Kamble

  • बबनराव तायवाडे यांचे उपोषण सहा दिवस चालले.

  • सरकारने ओबीसी आरक्षण सुरक्षित राहील, अशी ग्वाही दिली.

  • मंत्री अतुल सावे यांनी मागण्यांवर तातडीने निर्णय जाहीर केला.

  • हमी मिळाल्यानंतर तायवाडे यांनी पाणी पिऊन उपोषण सोडले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर ओबीसी नेते बबनराव तायवाडे आक्रमक झाले होते. २ सप्टेंबर २०२५ रोजी सरकारने जारी केलेल्या जीआरला ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी विरोध दर्शवला होता. या निर्णयाविरोधात तायवाडे यांनी न्यायालयात जाण्याचे संकेत दिले होते. तसेच त्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता. त्यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस. सरकारकडून हमी मिळाल्यानंतर तायवाडे यांनी पाणी पिऊन उपोषण सोडले आहे.

मंत्री अतुल सावे यांनी तायवाडे यांच्या आंदोलानाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच ओबीसी आरक्षणावर कोणतीही गदा येणार नाही, अशी ग्वाही दिली. ' यात काही विषयासाठी मुंबईत बैठक घेऊ. ओबीसी आरक्षण सुरक्षित राहिल', असं सावे यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर त्यांनी अतिवृष्टी पंचनामे, शिष्यवृत्ती, म्हाडा- सिडको, कर्जसुविधा याबाबतही अनेक घोषणा केल्या.

यावेळी भाजप आमदार परिणय फुके यांनी तायवाडे यांचे आभार मानले. 'ओबीसी जागृत आहे, हे तायवाडे यांनी दाखवून दिले. मुख्यमंत्री यांनी दोन्ही समाजाला न्याय दिला. ६ दिवसांच्या उपोषणात १२ मागण्या पूर्ण झाल्या. दोन विषयांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. सर्वात जास्त ओबीसींसाठी जीआर काढणारे महाराष्ट्र राज्य ठरेल', असं परिणय फुके म्हणाले.

तायवाडे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं की, 'समक्ष खुल्या पद्धतीने चर्चा झाली, लपून बोललो नाही. मंगळवारी मुंबईत चर्चा करून,१४ मागण्याचे शासन निर्णय एक महिन्यांत काढण्याचा निर्णय घेतला आहे. २ मागण्यांबाबत मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे. उपसमितीत या विषयी चर्चा होईल. मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन शिष्टमंडळ पाठवले त्यासाठी आभार.

लातूर, कल्याण, ठाणे, गोंदिया यासह अन्य ठिकाणी आंदोलण्यास थांबण्यास सांगतो. पुढेही अशाच ताकदीने उभे राहून मागण्या लावून धरू. आज उपोषण थांबवतो, थांबवण्याचा सूचना देतो', असं म्हणत तायवाडे यांनी पाणी पिऊन आंदोलन सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT