Laxman hake on Manoj Jarnge Saam TV
महाराष्ट्र

Jalna News : मनोज जरागेंना लय पुळका आलाय, महादेव जानकरांना पाडण्यासाठी किती बैठका घेतल्या? लक्ष्मण हाके संतापले

Laxman hake on Manoj Jarnge : मराठा आरक्षणाला विरोध करण्याऐवजी ओबीसी नेत्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता.

Satish Daud

मराठा आरक्षणाला विरोध करण्याऐवजी ओबीसी नेत्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावर लक्ष केंद्रित करा, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. धनगर बांधवांनी ठरवलं की एसटी प्रवर्गातून आरक्षण घ्यायचं ठरवलं तर त्यांना ते मिळू शकतं, असं विधानही जरांगे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी चांगलाच समाचार घेतला.

मनोज जरांगे पाटील यांना धनगर समाजाचा लय पुळका आलाय का? महादेव जानकर यांना पाडण्यासाठी त्यांनी किती बैठका घेतल्या? असे तिखट सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारले आहेत. कोणाच्याही प्री प्लान अजेंड्यावर काम करायला आम्ही काही जरांगे नाही, असा टोलाही त्यांनी जरांगे यांना लगावला आहे. ते जालन्यात माध्यमांसोबत बोलत होते.

राज्य सरकारने सगेसोयरेचा अध्यादेश काढू नये, तसेच ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी लक्ष्मण हाके हे जालन्यात प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत मी माघार घेणार नाही, असा निर्धार हाके यांनी व्यक्त केला आहे.

माध्यमांसोबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, "मनोज जरांगे यांना धनगर समाजाचा लय पुळका आला का? परभणीतून महादेव जानकर यांना पडण्यासाठी किती बैठका घेतल्या हे जरांगे यांनी सांगावं. जरांगे साहेब तुम्हाला नॉलेज नाही. तुम्हाला कुठल्या चळवळी आंदोलन माहित नाही. धनगरांच्या चार पिढ्या एसटी आरक्षणासाठी भांडताय. ते आम्ही बघू, धनगर समाज दूधखुळा वाटला का".

"ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी धनगर समाज मोठा भाऊ म्हणून पुढे येणार. आमच्या ताटातलं हक्काच आरक्षण आहे. 27% मध्ये 3.5% टक्के रिझर्वेशन धनगर समाज आहे. लक्ष्मण हाकेला इथल्या बारा बलुतेदार घटनेचा तसेच कायद्याचा अभ्यास आहे. कुणाच्याही सांगण्यावरून काम करायला मी काय जरांगे आहे का", असा टोला देखील हाके यांनी जरांगे यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT