रणजित माजगावकर, प्रतिनिधी|ता. ६ जानेवारी २०२४
पंढरपूरमध्ये आज ओ.बी. सी भटके विमुक्त एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ, आमदार महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे यांच्या सह राज्यातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. यावेळी मेळाव्याला संबोधित करताना मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणावरुन पुन्हा एकदा मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला.
काय म्हणाले छगन भुजबळ?
"आज चित्र बदलले आहे, अन्याय करणारे बदलले आहेत, त्यांना विरोध केला पाहिजे. अन्याय करणाऱ्यांविरोधात आता बोलले पाहिजे. समोरच्यांच्या मागण्या वाढत आहेत. जेसीबीने फुले उधळतात, हेलिकॉप्टरने फुले उधळतात ते गरीब आहेत म्हणून सांगतात. अशी टीका छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली.
ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाहीच!
तसेच "मराठा बांधवांना आरक्षण हवं तर स्वतंत्र आरक्षण द्यावं. ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. आमचा मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध नाही, पण मराठ्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या झुंड शाहीला विरोध असल्याची घणाघाती टीका यावेळी छगन भुजबळांनी केली.
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हल्ले..
"शिवाजी महाराज हे मराठा सैनिक कधीही म्हणत नव्हते तर मावळे म्हणत होते. कारण महाराजांकडे सगळ्या जातीचे मावळे होते. शिवाजी महाराजांचे नाव घेता अन् आमच्यावर हल्ले करता? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. तसेच आरक्षण हे गरिबी आणि श्रीमंती यावर ठरत नाही. आरक्षण मिळाले म्हणजे माणूस श्रीमंत होतात असे नाही. हजारो वर्षांपासून दबलेल्यांसाठी आरक्षण आहे..." असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.