नवीन वर्षातला पहिला सण असणाऱ्या संक्रातीचे सगळ्यांना वेध लागलेत. संक्रात म्हणजे पतंगोत्सव आलाच. त्यामुळे आकाशातही पतंगांची गर्दी दिसू लागलीय... मात्र पंतंगांसाठी वापरला जाणारा मांजा नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय. पुण्यात आठवड्याभरापूर्वी याचं नायल़ॉन मांजामुळे एका महिलेला मानेवर गंभीर दुखापत झाल्याचं उघड झालं होतं...
नायलॉन मांजामुळे दरवर्षी हजारो पक्षीही जखमी होतात. त्यामुळे हायकोर्टानं नायलॉन मांजाच्या विक्री आणि वापरावर बंदी घेतलीय.....अशातच एखाद्या अल्पवयीन मुलानं नायलॉन मांजाचा वापर केला तर त्याच्या पालकांना जबाबदार धरत थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे....
जीवघेणा नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यास 25 हजारांचा दंड
नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास अडीच लाखांचा दंड
अल्पवयीन मुलाकडे मांजा आढळल्यास पालकांना दंड होणार
हा नियम केवळ संक्रांतीपुरता नाही, वर्षभरासाठी लागू
दंडाची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष खात्यात जमा होणार
महापालिका आणि पोलिसांवर दंड वसुलीची जबाबदारी
क्यूआर कोडच्या माध्यमातून दंड वसुली होणार
दरम्यान पालकांनी मुलांना नायलॉन मांजाच्या धोक्याबाबत समज द्यावी, असं आवाहन न्यायालयानं केलयं... याआधी नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगरात विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शहरापासून ते अगदी गावाच्या बाजारपेठेतून हा जीवघेणा नॉयलॉन मांजा कधी हद्दपार होणार हाच खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.