Amravati Police अमर घटारे
महाराष्ट्र

Amravati Crime: फिजिओथेरपी शिकवण्याच्या नावाखाली डॉक्टरकडून नर्सचा विनयभंग

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी नर्सचा विनयभंग करणाऱ्या फिजिओथेरपिस्टची कामावरुन हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे -

अमरावती : अमरावती येथील पारवानी हॉस्पिटलमधील फिजिओथेरपिस्टने हॉस्पिटलमध्ये नव्याने कामावर रुजू झालेल्या नर्सचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणाबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Nurse Molestation By Doctor)

युवासेनेच्या (Yuvasena) कार्यकर्त्यांनी नर्सचा विनयभंग करणाऱ्या फिजिओथेरपिस्टची कामावरुन हकालपट्टी करण्याची मागणी करत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये राडा केला आहे.

हे देखील पाहा -

अमरावती (Amravati) शहरातील राजापेठ परिसरातील पारवानी हॉस्पिटलमध्ये एका फिजिओथेरपिस्टने फिजिओथेरेपी (Physiotherapy) शिकवतो, या बहाण्याने नवीनच कामावरती रुजू झालेल्या एका नर्ससोबत अश्लील चाळे करत तीचा विनयभंग केला. त्यानंतर लगेचच नर्सने लगेचंच राजापेठ पोलीस स्टेशन गाठले व त्याची तक्रार केली.

त्यानंतर ही घटना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळताच युवासेनेचे शहर प्रमुख राहुल माटोडे व त्यांचे कार्यकर्ते त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले व राडा केला. हॉस्पिटलमध्ये हा फिजिओथेरपिस्ट नकोच असे म्हणत फिजिओथेरपिस्ट आशीष चौधरी यांचे हॉस्पिटलमधील बोर्ड फाडत त्यांच्या डिग्रीचे सर्व बोर्ड फोडले, त्यानंतर राजापेठ पोलिसांनी आरोपी अशी चौधरी यांना अटक केली असून त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT