Maharashtra Home Department News : तृतीयपंथीयांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. गृह विभागाच्या सर्व भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठीही (ट्रान्सजेंडर) पर्याय ठेवणे अनिवार्य असेल, असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) मुंबई खंडपीठाच्या अध्यक्ष मृदुला भाटकर यांनी नुकतेच दिले आहेत. (Latest Marathi News)
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) मुंबई खंडपीठाने तृतीयपंथीयांसाठी गृह विभागाला मोठा आदेश दिला आहे. मॅटच्या आदेशानुसार गृह विभागाच्या सर्व भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठीही (Transgender) पर्याय ठेवावा लागणार आहे. तसेच भरती प्रक्रियेतील तृतीयपंथीयांच्या श्रेणीसाठी शारीरिक चाचणीचे निकषही निश्चित करण्याचेही न्यायाधिकरणाने गृह विभागाला सांगितले आहे.
पोलीस हवालदार पदाचा ऑनलाईन अर्ज भरताना अर्जात पुरुष आणि स्त्री असे दोनच पर्याय उपलब्ध होते. अर्जदार हा तृतीयपंथीय असल्याने तो दोन्हीपैकी कोणत्याच पर्यायाची निवड करू शकला नाही. परिणामी त्याचा अर्ज स्वीकारला गेला नाही. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध नसल्याविरोधात तक्रारदाराने मॅटकडे याचिका दाखल केली.
भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठीही पर्याय उपलब्ध करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर तृतीयपंथी अर्जदाराची मागणी मान्य झाली. त्यामुळे गृह विभागाच्या सर्व भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठीही (ट्रान्सजेंडर) पर्याय ठेवणे अनिवार्य असणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने २०१४ रोजी दिलेल्या आदेशानुसार शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांना आरक्षण बंधनकारक असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. सदर निर्णयामुळे तृतीयपंथीयांना राज्यातील गृह विभागाच्या सर्व भरती प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.