Solapur News Saam TV
महाराष्ट्र

Solapur News: नवरदेवांची वरात कलेक्टर ऑफिसच्या दारात; तरुणांवर ही वेळ का आली ?

स्त्री भ्रूण हत्या वाढत चालल्याने गावात पुढची पिढी कशी घडणार असा प्रश्न देखील तरुणांनी उपस्थित केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Soalpur News: सोलापूरमध्ये जिल्हाधीकारी कार्यालयासमोर आज एक अजब प्रकार घडला. गावातील नवरदेवांनी जिल्हाधीकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला. लग्नासाठी मुलगी पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. मोर्चात सहभागी झालेली सर्व मुलं तरुण आणि अविवाहित आहेत. वय उलटून चालले तरी लग्न होत नसल्याने त्यांनी हा मोर्चा काढला आहे. ( Latest Solapur News)

सोलापूर जिल्ह्यातच नाही तर अन्य गावांमध्ये देखील ५० च्या आसपास अविवाहित मुलं आहेत. या मुलांना गावात लग्नासाठी मुली राहीलेल्या नाहीत. स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण अजूनही कमी झालेलं नाही. त्यामुळे आता पुढच्या पिढीतील मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. अनेक व्यक्ती गर्भातच गर्भलिंग निदान करतात. मुलगी असल्यास तिला गर्भातच मारून टाकतात. मुलींना जन्म देत नाहीत. त्यामुळे मुलींची संख्या कमी होत चालली आहे.

याचाच निषेध व्यक्त करत सोलापूरच्या (Solapur) अविवाहित तरुणांनी मोर्चा काढला आहे. यात जवळपास १०० बिनलग्नाचे नवरदेव मोर्चात सहभागी झाले होते. तर २० नवरदेव घोड्यावर बसून वाजतगाजत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले. ज्योती क्रांती परिषदेमार्फत सदर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. गर्भलिंग निदान कायदा कडक करावा तसेच तरुण मुलांना मुली मिळाव्या या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातल्या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यलयावर हा मोर्चा काढला.

स्त्री भ्रूण हत्या (Female Feticide) वाढत चालल्याने गावात पुढची पिढी कशी घडणार असा प्रश्न देखील तरुणांनी उपस्थित केला आहे. मुलगा किंवा मुलगी दोन्ही समान आहेत. मुली देखील मुलांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी तसेच औद्योगिक क्षेत्रात नाव कमवत आहेत. मात्र तरी देखील अनेक ठिकाणी मुलींना जन्म दिला जात नाही. शासनाने स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे मत या अविवाहित नवरदेवांनी व्यक्त केले आहे. तरुणांनी या मोर्चातून भीषण वास्तव समोर आणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मेगा ब्लॉकमुळे 'मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस' रद्द

Mumbai : एसआरए इमारतीत BMC कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, मुंबईत धक्कादायक घटना

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT