जामखेडमध्ये न्याय्य हक्कांसाठी अठरापगड जातींनी आंदोलन केले. साम टीव्ही
महाराष्ट्र

जामखेडला अठरापगड जातीचे पारंपरिक वेशात आंदोलन

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : तालुक्यातील पोतराज, वासुदेव, मदारी, डवरी गोसावी, पारधी, भिल्ल, कैकाडी, रामोशी, डोंबारी, दलित, धनगर, वंजारी, तिरमाली व इतर अठरापगड जातींतील वंचित घटकांनी आपल्या न्याय हक्कांसाठी पारंपरिक वेशभूषेत वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली निर्धार मोर्चाच्या निमित्ताने जामखेड शहर दणाणून सोडले.

वंचितचे राज्य संघटक ॲड. अरुण जाधव, उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला. ओबीसी, मुस्लिम आरक्षण, भटक्या विमुक्तांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पारधी विकास आराखडा योजनेची अमंलबजावणी, रेशन कार्ड, आधार कार्ड, जातीचे दाखले, घरकुलासाठी जागा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. बसस्थानकासमोरुन निघालेल्या मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयासमोर जाहीर सभेत झाले. सकाळी अकरा वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी तीन वाजता संपले.

द्वारका पवार, विकी सदाफुले, बाळासाहेब महाराज गाडे, रावसाहेब खोत, तान्हाजी बनसोडे, मौलाना खलील तामसी, अरविंद सोनटक्के, स्वप्नील खाडे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहळ यांनी, तर सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले. निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी स्वीकारले.

हटके आंदोलनाची परंपरा जपली

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ॲड. अरुण जाधव यांनी यापूर्वी पाल ठोको, जागरण गोंधळ आंदोलन, कुटुंबातील लहान-थोरांसह केलेले उपोषण लक्षवेधी ठरले होते. याही वेळी पारंपरिक वेशभूषेतील आंदोलन लक्षवेधी ठरले.

स्वातंत्र्य मिळवून ७५ पेक्षा जास्त वर्षे होऊनही जनतेवर मागण्यांसाठी आंदोलने, मोर्चे काढण्याची वेळ येत आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करून उपेक्षित, वंचितांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. भटके विमुक्त व ओबीसींची जनगणना तातडीने करावी.

- ॲड. अरुण जाधव, राज्य संघटक, वंचित बहुजन आघाडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Decision: मोठी बातमी! आता या लोकांचं जन्म-मृत्यू प्रमाणपत्र होणार रद्द; सरकारने घेतला मोठा निर्णय

नागपूरमध्ये कंत्राटदाराची आत्महत्या, शरद पवारांच्या नेत्याला ठोकल्या बेड्या, विदर्भाच्या राजकारणात खळबळ!

Jio ₹189 vs Jio ₹198: जिओ १८९ आणि १९८ प्लॅनमधून सर्वोत्तम कोणता? जाणून घ्या

Scholarship News: शिष्यवृत्तीसाठी सरकारचा मोठा निर्णय! लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा | Video

Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं! मध्यरात्री ५ जणांचा गोळीबार, निलेश घायवाळ टोळीकडून फायरिंग

SCROLL FOR NEXT