Ladki Bahin Yojana Update canva
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाही? आदिती तटकरेंच्या वक्तव्यानं खळबळ

aditi tatkare on ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनासंदर्भात आदिती तटकरेंनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रातील महिलांमध्ये खळबळ उडाली आहे. २१०० रूपये मिळण्यास विलंब होणार असल्याचे दिसतेय.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana Scheeme News : लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. पण यंदाच्या अर्थसंकल्पात ते आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. यासाठीची कोणतीही पूर्वतयारी विभागाने केलेली नाही, तसा प्रस्ताव तयार करून अर्थ विभागाकडे पाठवलेलाही नाही. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनीही यास दुजोरा दिलेला आहे.

"आर्थिक भार किती आहे, याबाबतचा अभ्यास करून २१०० रुपयांचा निर्णय घेतला जाणार आहे. महायुतीच्या घोषणापत्रात २१०० रुपयाचे आश्वासन असल्याने कालांतराने ती लागू केली जाईल. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात ही वाढ लागू करण्याबाबत विभागाने अद्याप तयारी केलेली नाही. तशा सूचनाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या नाहीत' असे मंत्री आदिती तटकरे यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी अर्थ विभागाने त्याची तयारी तीन ते चार महिने अगोदर सुरू केली होती. २१०० रुपयापर्यंत वाढविण्यासाठी देखील तशीच तयारी करावी लागेल. मात्र अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत.
आदिती तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री

गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने ही योजना राज्यात राबवून सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत. त्यासाठी ४६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. नव्या अर्थसंकल्पात महायुती त्यांच्या जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे दोन हजार १०० रुपये देणार, असे अपेक्षित होते, मात्र या अर्थसंकल्पात 'लाडक्या बहिणीं'चा आर्थिक भार अजून वाढू नये याची काळजी महायुती सरकारने घेतली आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेला उत्तर देण्यासाठी राज्यात महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन हजार रुपये दर महिन्याला देण्याचे आश्वासन दिले होते. म्हणून महायुतीने एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिंदूंनी किमान तीन,चार मुलं जन्माला घातले पाहिजे; नवनीत राणा यांचा सल्ला

Maharashtra Live News Update: युतीची घोषणा उद्या होणार, दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा सुरू - संजय राऊत

BJP- Shiv Sena Yuti: भाजप- शिवसेनेच्या युतीमध्ये कोण घालतोय खोडा? लवकर निर्णय घ्या नाहीतर...,शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर इशारा

Cow Milk Malai : गाईच्या दुधावर घट्ट मलई जमवण्याची सोपी ट्रिक

Kolhapur : पाठलाग केला, प्रवाशांना चाकूचा धाक; कोल्हापूर-मुंबई खासगी बस हायजॅक, सोनं-चांदीसह १.२२ कोटींचा मुद्देमाल लुटला!

SCROLL FOR NEXT