Prashant Jagtap after meeting Sharad Pawar, confirming that both NCP factions will not reunite ahead of civic elections. Saam Tv
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला अखेर पुर्णविराम? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही

Twin NCP Alliance Shut Down: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र आल्या होत्या. मात्र आगामी महापालिका निवडणुकीत तसं होणार नाही. शरद पवारांच्या पक्षाचा काय निर्णय झालाय ?

Bharat Mohalkar

पुण्यासह राज्यातील महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगली होती.. मात्र अखेर या चर्चेला पुर्णविराम लागलाय.. पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी पवारांच्या भेटीनंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केलीय...

खरंतर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी कोल्हापूर, बीडसह राज्यात अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीने युती केली...त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगली होती...पदाधिकाऱ्यांनीही एकत्र येण्याचा नारा दिला होता..मात्र पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगतापांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिला.... आणि त्यानंतर पुन्हा चक्रं फिरली..

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी टोकाची टीका केली... मात्र विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षाचे नेते वेगवेगळ्या कार्यक्रमात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगली होती...

मात्र आता पवारांच्या भेटीनंतर प्रशांत जगताप यांनी अखेर या चर्चांवर पडदा टाकलाय. तर पुणे महापालिकेत मविआ म्हणून निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत.मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं, असं म्हणतात त्याप्रमाणे राजकीय गरज म्हणून आगामी काळात पुन्हा काका आणि पुतण्याचे सूर जुळणार का आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावमध्ये अवकाळी पावसाची हजेरी; दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण

PMPML Mobile App: तिकीटासह पासची सेवाही अ‍ॅपवर; पीएमपी ॲपमुळे पुणेकरांचा प्रवास झाला सोपा

Masala Maggi Recipe: फक्त १० मिनिटांत नाश्त्याला बनवा मसाला मॅगी

Heart Attack: छातीत न दुखताही महिलांना हार्ट अटॅकचा धोका? तज्ज्ञांनी सांगितली 7 लक्षणे, अजिबात करु नका दुर्लक्षित

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेच्या नियमात मोठे बदल; कोणाला मिळतो योजनेचा लाभ?

SCROLL FOR NEXT