अँटीजन टेस्टविना बीड जिल्ह्यात प्रवेश नाही.. विनोद जिरे
महाराष्ट्र

अँटीजन टेस्टविना बीड जिल्ह्यात प्रवेश नाही..

बीड जिल्ह्याच्या सीमेवर आजपासून अँटीजन टेस्ट सुरू....

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने, नियमांमध्ये शिथीलता मिळालेली नाही. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर कमी व्हावा यासाठी, कडक उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सीमेवर, प्रशासनाच्या वतीने चेक पोस्ट उभारण्यात आल्या असून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत.

हे देखील पहा -

बीड जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ज्या तालुक्यात कोरोना बधितांची संख्या अधिक आहे. अशा आष्टी, गेवराई, शिरूर, पाटोदा या तालुक्यात अहमदनगर व अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे, जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारून, अँटीजन टेस्ट केल्यानंतरच जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा, असे आदेश दिले आहेत. या आदेशांची अंमलबजावणी सुरू झाली असून शिक्षक, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वतीने हे काम सुरू आहे.

आष्टी तहसीलदार शारदा दळवी म्हणाल्या कि, गेल्या दोन दिवसांपूर्वी केलेल्या या नियमाची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि अलिकडेच कोरोना चाचणी केलेल्या व्यक्तींना यामधून सूट देण्यात आली आहे. तर बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

SCROLL FOR NEXT