Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation: 'मराठा आरक्षणामुळे पराभव नाही', भुजबळांचा दाव्यावर जरांगेंचा इशारा; विधानसभेत मराठा आंदोलन कुणाला भोवणार?

Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. याउलट महाविकास आघाडीच्या जास्त जागा मिळाल्या. मराठा आरक्षण आंदोलनाची धग याला कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. यावरुन भुजबळ आणि जरांगे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

Girish Nikam

लोकसभा निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक फटका बसला तो मराठा आरक्षणाचा आणि हे दुसरं तिसरं कुणी नव्हे तर खुद्द फडणवीसांनीच हे मान्य केलंय. याचा सर्वाधिक फटका मराठवाड्यात बसल्याचं दिसलं. कारण मराठा-ओबीसींमध्ये मोठं जातीय ध्रुवीकरण झालं.

अजित पवारांनीही बीड, परभणीसह काही जिल्ह्यात मराठे आणि मराठेत्तर अशी निवडणूक झाल्याचं सांगितलं आहे. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना हे मान्य नाही. मराठा आरक्षणाच्या वादामुळे आम्ही पडलो, असे समजू नका. कारण विदर्भात तो वाद नव्हता. तिथेही आपला पराभव झाल्याचा दावा भुजबळांना केलाय.

भुजबळांनी असा दावा केला असला तरी निकालांच्या विश्लेषणातून मात्र मराठा आरक्षणाच्या फटका बसल्याचं समोर आलंय. यातच भुजबळांनी केलेल्या दाव्याबाबत जरांगेंना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, थोडं थांबा कळेल तुम्हाला.

मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलंय. त्यांची प्रकृती खालावत चाललीय. त्यात त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय. त्यामुळे हे उपोषण चिघळण्याची शक्यता आहे.

भुजबळ आणि जरांगेंचं विळ्या-भोपळ्याचं नातं सा-या महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र भुजबळांनी आता पुन्हा मराठा आरक्षणाच्या मुद्याला हवा दिलीय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीसाठी हा मुद्दा पुन्हा डोकेदुखी वाढवणार का याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT