राज्यात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय अजून झाला नाही: राजेश टोपे Saam Tv
महाराष्ट्र

राज्यात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय अजून झाला नाही: राजेश टोपे

राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय अजून झाला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग यांच्याशी योग्य वेळी चर्चा करून निर्णय घेतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यात रात्रीची संचारबंदी Night Curfew लावण्याचा निर्णय अजून झाला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्स Task Force आणि आरोग्य विभाग Health Department यांच्याशी योग्य वेळी चर्चा करून निर्णय घेतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी दिली आहे. ते जालन्यात Jalna बोलत होते. केंद्राने केरळ Kerala आणि महाराष्ट्रात Maharashtra रात्रीची संचारबंदी लावावी अशी शिफारस केलेली आहे. मात्र मुख्यमंत्रीच CM याबाबत निर्णय घेतील असं टोपे यांनी सांगितलं.

हे देखील पहा-

कोकणात Konkan जाणाऱ्या चाकरमान्यांना दोन डोस घेणे बंधनकारक राहणार असून, हे नियम चाकरमान्यांनी पाळावे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात सरकारच्या नकारानंतर देखील दहीहंडी साजरी करणार या मनसेच्या MNS निर्णयावर देखील टोपे यांनी भाष्य केलं.

सण -उत्सव सर्वांनाच्याच आवडीचे असतात मात्र नियमात राहून आणि शासनाच्या नियमांचं पालन करून दहीहंडी साजरी करावी असं आवाहन टोपे यांनी केलं. मंदिरं BJP Protest for Opening Temple उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजप राज्यभर शंखनाद आंदोलन करत आहे.

मात्र सध्या सर्वांनी जनहिताच्या नियमांचं पालन करावं असंही त्यांनी सांगितलं. राज्यात कोरोना Corona बाधितांचा आकडा घटत असून मृत्यूचा आकडा Death Rate देखील घटत आहे. अशी माहिती टोपे यांनी दिली. जो डॉक्टर कोरोना बाधितांची हेळसांड करतो त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई Action केली जाईल अशी माहिती टोपे यांनी दिली.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT