सरण ही थकले मरण पाहुनी, मरणानंतरही भोगाव्या लागतायत नरक यातना अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

सरण ही थकले मरण पाहुनी, मरणानंतरही भोगाव्या लागतायत नरक यातना

स्मशानभूमी शेड नसल्याने ताडपत्री पकडून भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ

अभिजीत सोनावणे साम टीव्ही नाशिक

नाशिक -  सुरगाणा तालुक्यातील माळेगाव Malegaon ग्रामपंचायत मधील पिळूकपाडामध्ये स्मशानभूमी अभावी भरपावसात एका मृतदेहाची अवहेलना झाल्याचे समोर आले आहे. २३ तारखेची ही घटना आहे. एका वाहन चालकाचे आकस्मिक निधन झाले. मात्र गावात अंत्यविधीसाठी स्मशानभूमी शेडच cemetery shed नसल्यामुळे काही तास पाऊस थांबण्याची वाट पाहून अखेर संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. मात्र कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायचा कसा? अशा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

हे देखील पहा -

कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात. पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागत असल्याने मृतदेहांची अवहेलना होते. सुरगाणा तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील अनेक भागात अद्यापही स्मशानभूमी नाही. आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो.

मात्र अनेक गावात स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह घ्यावे लागतात. शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. त्यामुळे आदिवासी भागात अनेक ठिकाणी मरणानंतरचा प्रवास देखील खडतर बनला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT