Pune News  Saam TV
महाराष्ट्र

174 लाचखोर अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई नाही; शिक्षण, क्रीडा विभाग आघाडीवर...

लाचेची मागणी सिद्ध करणारे पुरावे निलंबनाची कारवाई आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: लाचखोर कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित असताना राज्यातील 174 लाचखोर अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे, विशेष म्हणजे लाच घेताना रंगेहाथ पकडले असताना तत्काळ निलंबन करावे असे शासनाचे आदेश असताना ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. लाचखोर कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले असतानाही अशा कर्मचाऱ्यांना निलंबित न करता केवळ लोकांशी संपर्क येणार आशा ठिकाणी बदली केल्याचे नगरविकास  विभागाच्या निदर्शनास आले, त्यामुळेच नगरविकास विभागाने 16 मार्च रोजी एक परिपत्रक काढलं आहे. 

लाचेची मागणी सिद्ध करणारे पुरावे  निलंबनाची कारवाई आवश्यक असल्याचे म्हटले आहे, तशा सूचना नगरविकास विभागाने नगरपंचायती, नगर परिषदा, महापालिकांना दिल्या आहेत असे असतानाही वरीष्ठ अधिकारी लाचखोरांवर निलंबनाची कारवाई करताना दिसत नाही. राज्यातील 174 जणांवर सापळा रचून कारवाई झालेली असतानाही त्यांचे निलंबन झालेले नाही, त्यात सर्वाधिक शिक्षण, क्रीडा विभागातील कर्मचारी आहे.

कोणत्या खात्यातील किती अधिकारी

ग्रामविकास 32

शिक्षण आणि क्रीडा 45

महसूल, नोंदणी, भूमि अभिलेख,16

पोलीस, कारागृह, होमगार्ड- 14

नगरविकास-मनपा नगरपालिका- 22

उद्योग ,ऊर्जा, कामगार- 9

आरोग्य- 2

विधी आणि न्याय- 4

वन- 5

निलंबित न केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यां क्षेत्रांवहाय संख्या

मुंबई- 29

ठाणे- 20

पुणे- 12

नाशिक- 2

नागपूर- 56

अमरावती- 18

औरंगबाद- 8

नांदेड- 27

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT