Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : निजामाबादमध्ये भीषण अपघात; कार अपघातात ४ तरुणांचा जागीच मृत्यू , कुटुंबावर शोककळा

तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातून भीषण अपघाताचं मोठं वृत्त समोर आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

Nanded News : तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातून भीषण अपघाताचं मोठं वृत्त समोर आलं आहे. निजामाबाद जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत नांदेड जिल्ह्यातील तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने अपघातस्थळी एकच खळबळ उडाली.

निजामाबाद जिल्ह्यातील जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. नांदेडच्या (Nanded) बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील दोन सख्ख्या भावा सह अन्य दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या (Accident) वृत्तानंतर कुंडलवाडी परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

अपघात केव्हा झाला?

निजामाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण रविवारी मध्यरात्री अपघात झाला. तेलंगणा राज्यातील इंदलवाई मंडळातील चंद्रायनपल्ली येथे हा अपघात झाला आहे . या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. यात नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील निरडी परिवारातील दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.

या अपघातात गणेश निरडी आणि आदित्य निरडी या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. तर प्रकाश अंकलवार , साईराम भाळे अशी मृतांची नावे आहेत. प्रकाश अंकलवार हा देखील कुंडलवाडी येथील रहिवाशी आहे. तर साईराम भाळे हा निजामाबाद येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

नातेवाईक निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे. तरुणांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तरुण मुलांचा अपघातात मृत्यू झाल्याने कुंडलवाली शहरावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT