nivrutti indurikar maharaj saam tv
महाराष्ट्र

Indurikar Maharaj: किर्तनकार इंदोरीकर महाराजांची तब्येत बिघडली; सर्व कार्यक्रम रद्द

येत्या 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम आयाेजकांना महाराजांनी पत्र लिहले आहे.

सचिन आगरवाल

नगर : किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (nivrutti indurikar) (इंदोरीकर महाराज) यांच्या तब्येत (health) बिघडल्याने तसेच वैद्यकीय अधिकारी (doctor) यांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीस पाठविल्याने त्यांचे 30 मे पर्यंत हाेणार सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. (indurikar maharaj latest marathi news)

राज्यातील विविध भागात इंदाेरीकर महाराज यांचे 30 मे पर्यंत किर्तनाचे कार्यक्रम आयाेजित करण्यात आले आहेत. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्या सूचनेनंतर इंदाेरीकर महाराज यांनी आयोजकांना कार्यक्रमास येऊ शकत नाही असे कळविण्यास प्रारंभ केला आहे. वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा सेवेत रूजू हाेईन असे त्यांनी नमूद केले आहे.

संयाेजकांना पाठविलेल्या पत्रात इंदाेरीकर महाराज लिहितात इच्छा असूनही कार्यक्रमास येऊन शकत नाही. त्यामुळे कार्यक्रमांच्या संयाेजकांची तसेच आयाेजकांची गैरसाेय हाेत आहे. त्याबद्दल मनापासून दिलगीर आहाेत. वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पुर्व नियाेजित कार्यक्रम पार पडतील. आपल्या सर्वांच्या आशिर्वाद पाठीशी आहेत असेच प्रेम कायम लाभावे असेही इंदाेरीकर महाराज यांनी पत्रात नमूद केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडी ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT