Nitin Gadkari Saam Tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari: काही कंत्राटदार अन् टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार, मंत्री गडकरींकडून सज्जड इशारा

Nitin Gadkari Warns Contractors: "मी आता काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार आहे. त्यांचे फोटो काढणार आहे," अशा कडक शब्दांत मंत्री नितीन गडकरी यांनी कामचुकार कंत्राटदारांना इशारा दिला.

Bhagyashree Kamble

"मी आता काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार आहे. त्यांचे फोटो काढणार आहे," अशा कडक शब्दांत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदारांना इशारा दिला आहे. सरकारी कामाकाजातील अनियमितता आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी कंत्राटदारांची कार्यपद्धती, पात्रता आणि गुणवत्ता यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

गडकरी सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रजत जयंती कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी कंत्राटदारांना धारेवर धरत तंबी दिली. कार्यक्रमात मंत्री गडकरी म्हणाले, "जे कंत्राटदार योग्य आणि गुणवत्तापूर्ण काम करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मी आता काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार आहे. त्यांना तुरुंगात टाकून फोटो काढणार आहे", अशा शब्दांत गडकरींनी कामचुकार कंत्राटदारांना धाऱ्यावर धरलं.

"पूर्वी तांत्रिक आणि आर्थिक पात्रतेच्या आधारे कंत्राटदारांची निवड व्हायची. पण नंतर काळा कोट घालून जो यायचा त्यालाच कंत्राट दिलं जायचं, एवढंच बाकी राहिलं होतं," असा खोचक टोलाही त्यांनी सरकारी यंत्रणेला लगावला.

ब्रम्हपुत्रा नदीखाली भुयारी टनेल

या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी एक महत्त्वाची घोषणाही केली. ब्रम्हपुत्रा नदीखाली १२,००० कोटी रुपये खर्चून एक टनेल बांधण्यात येणार असून, हा खर्च कमी करण्यासाठी गेले वर्षभर त्यांनी तांत्रिक आणि आर्थिक अभ्यास केला असल्याचं गडकरींनी माहिती दिली.

पारदर्शकता,भ्रष्ट्राचारमुक्त व्यवस्था,जलदगती निर्णय घेण्याची क्षमता, आणि गुणवत्तापूर्ण काम आवश्यक असल्याचेही यावेळी गडकरी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन; मिथेनॉलचा मोठा साठा जप्त; IAS तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

Bhadra Rajyoga: उद्या बुध बनवणार भद्र राजयोग; या राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसे

Skin Care: पार्लरमध्ये पैसे खर्च नकरता चेहरा दिसेल नॅचरल ग्लो, १ महिना प्या 'हा' स्पेशल चाहा

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Acidity : आलं की बडीशेप; ॲसिडीटीवर गुणकारी चहा कोणता? रोज १ कप प्या अन् पोट साफ करा

SCROLL FOR NEXT