Union Minister Nitin Gadkari at a public event in Ranchi, hints at major toll tax reform in 3 days. saam TV News
महाराष्ट्र

Nitin Gadkari : ३ दिवसात खुशखबर, टोलबाबत नितीन गडकरींकडून मोठं वक्तव्य

Nitin Gadkari On Toll Tax : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोलसंदर्भात एक मोठी घोषणा येत्या तीन दिवसांत होणार असल्याचे संकेत दिले आहेत. जास्तीत जास्त 3 दिवस थांबा, टोलसंदर्भात मोठी घोषणा होईल, असे गडकरी म्हणाले.

Namdeo Kumbhar

Toll Tax News Update : टोल टॅक्सबाबत तीन दिवसांत मोठी खुशखबर मिळेल, अशी मोठी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केली. एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणार्‍यांना पुढील दोन ते तीन दिवसांत मोठी घोषणा करणार आहे, त्यानंतर टोलसंदर्भात कुणीही प्रश्न विचारणार नाही. एक्सप्रेस वे वरून प्रवास करणारे सगळेच खूश होतील असं गडकरींनी म्हटलंय.

गडकरी यांच्या या वक्तव्यानंतर कोणती मोठी घोषणा करण्यात येणार आहे, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. सध्या एक्सप्रेस वेवर अव्वाच्या सव्वा टोल घेतला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. काही तज्ज्ञांच्या मते, टोलवर वार्षिक पास योजना सुरू करण्यात येऊ शकते. (Annual toll pass likely for expressway commuters in India)

सगळी तयारी पूर्ण झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत त्याची घोषणा होणार आहे. टोल संदर्भात मोठी योजना आणणार आहे. त्यामुळे सर्वजण खूश होतील. दोन दिवसात याबाबतचे नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे. लोक पुन्हा टोलचा प्रश्न विचारणार नाहीत आणि सर्वजण खूश होतील. ३ दिवसात मला टोलवरून पुन्हा ट्रोल केलं जाणार नाही, असे गडकरी म्हणाले. ते रांची येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

गडकरी यांच्या या विधानाचा अर्थ काय असू शकतो, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. टोल टॅक्समधून पूर्णपणे मुक्ती किंवा सवलत मिळेल का? असा अंदाज व्यक्त करण्यात येणार आहे. गडकरी यांनी यापूर्वीही टोल रस्त्यांबाबत महत्त्वाची विधाने केली होती. त्यांनी देशभरातील टोल नाके हटवण्याची योजना स्पष्ट केली होती. यामुळे प्रवाशांना एक्सप्रेस-वेवर अखंडित आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळेल. मात्र, टोल नाके हटवले जाणार असले, तरी टोल टॅक्स कायम राहणार आहे. यातील बदल असा असेल की, प्रवाशांना आता फक्त त्यांनी टोल रस्त्यावर केलेल्या प्रवासाच्या अंतराएवढाच टॅक्स द्यावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

SCROLL FOR NEXT