जनतेच्या विकासाच्या कामात कुठलीही अडचण येऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांची गडकरींना ग्याही Saam Tv
महाराष्ट्र

जनतेच्या विकासाच्या कामात कुठलीही अडचण येऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांची गडकरींना ग्याही

विकास कामांच्या आड कुणालाही येऊ देणार नाही

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - जनतेच्या विकास कामात कुठलीही आणि कुणालाही येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी आज नितीन गडकरी Nitin Gadkari यांना दिली. नागपूरात मेट्रोच्या Nagpur Metro दोन स्टेशन आणि फ्रीडम पार्कच्या Freedom Park उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. महामार्गाच्या कामात शिवसेनेचे Shivsena पदाधिकारी आणि कार्यकर्ते अडथळे आणतात, कंत्राटदारांना धमकावतात, असे पत्र नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. या पत्रामुळे खळबळ उडाली होती.

हे देखील पहा -

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी या पत्राचा उल्लेख करत 'नितीनजी तुम्ही गोड बोलता, मात्र पत्र कठोर लिहता' असं म्हणत जनतेच्या कामात कुणालाही येऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, तुमचे आमचे नाते वेगळे वेगळे आहे, तुम्ही- आम्ही कर्तव्य कठोर आहोत, शिवसेना प्रमुखांची शिकवण तुम्हीही घेतली आहे.

जनतेशी कधीही विश्वासघात करायचा नाही, जे अधिकार मिळाले ते जनतेचे आशीर्वाद आहे. हे ऋण फेडणे हे कर्तव्य आहे. त्यामुळे जनतेच्या विकासाच्या कामात कोणत्याही प्रकारे आणि पद्धतीने मी कुणालाही येऊ देणार नाही, असे वचन दिले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Dispute: पक्षाची रचना आम्ही ठरवू, 'मुख्य नेता हे पद आलं कुठून?' कपिल सिब्बलांचा आक्रमक युक्तीवाद,आज कोर्टात काय-काय घडलं?

Maharashtra News Live Update: परतवाड्यातील तरुणींच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन

Palghar Crime: ६ जणांकडून तरुणीवर बलात्कार, मित्रासोबत पिकनिकला गेली असता भयंकर घडलं, पालघर हादरले

Thigh length and diabetes: मांडीची लांबी सांगणार टाईप-२ मधुमेहाचा धोका? नव्या अभ्यासातून धक्कादायक संकेत

Dahi Handi Holiday : मोठी बातमी! दहीहंडीची सरकारी सुट्टी रद्द, आता 'या' सणाला मिळणार सुट्टी; वाचा फडणवीस सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT