Rane vs Raut : 'या' गोष्टीशिवाय राऊतांनी निवडून येऊन दाखवावं; नितेश राणेंच चॅलेंज SaamTV
महाराष्ट्र

Rane vs Raut : 'या' गोष्टीशिवाय राऊतांनी निवडून येऊन दाखवावं; नितेश राणेंच चॅलेंज

राणे साहेब आज केंद्रीय मंत्री झाले आहेत आणि हे महाशय त्याच वयाचे असून खासदारकी मध्येच लुडबुड करत आहेत.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : नारायण राणेंनी (Naraya Rane) हिमंत असेल तर पुन्हा एकदा नाईक यांच्याविरोधात उभे राहावे, कुडाळ मालवणमधून निवडणूक लढवून दाखवावी. राणेंचे डिपॉझिट जप्त नाही केले तर शिवसेनेचे Shivena नाव सांगणर नाही. राणें यांच्या पोराचा दोनदा पराभव झाला, एकदा त्यांचा झाला. सिंधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही हे जिल्ह्याने दाखवून दिले असल्याची घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut) यांनी राणे कुटुंबीयांवरती केली होती.

हे देखील पहा -

त्यांच्या याच टीकेला उत्तर देताना भाजपा आमदार नितेश राणेंनी (BJP MLA Nitesh Rane) राऊतांना चॅलेंज दिलं आहे. ते म्हणाले 'विनायक राऊतांनी खासदारकी मध्येच अडकून पडले आहेत. तसेच नारायण राणें वरती बोलण्याशिवाय त्यांनी काहीच केलं नाही. भाजपच्या कार्यकारिणी मध्ये मी आता ठराव आणणार आहे की कोणीही विनायक राऊतांवर Vinayak Raut बोलू नये. आणि मग विनायक राऊत यांनी निवडून येऊन दाखवावं असं आपलं चॅलेंज असल्याचे ते म्हणाले.

तसेच नारायण राणे साहेब आज केंद्रीय मंत्री Union Minister झाले आहेत आणि हे महाशय त्याच वयाचे असून खासदारकी मध्येच लुडबुड करता आहेत. खासदारकी मध्येच अडकून पडले आहेत आणि कोणाला आव्हान देता आहेत? त्यांची एक ही बातमी राणेंसाहेबांशीवाय नसते. असा टोलाही नितेश राणे यांनी राऊतांना लगावला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

Mithila Palkar: गोड गोजिरी, लाज लाजिरी.... अभिनेत्रीच्या सौंदर्याने केलं घायाळ

SCROLL FOR NEXT