Nitesh Rane warns Uddhav Thackeray of revenge over Narayan Rane arrest video Saam TV News
महाराष्ट्र

बापाच्या अपमानाचा बदला घेणारच; राणेंचा ठाकरेंना इशारा, परतफेड करीन मग डिलीट करीन, 'तो' VIDEO चर्चत

Nitesh Rane on Uddhav Thackeray : बापाच्या अपमानाचा बदला घेणारच, असा इशारा मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंना दिलाय. मात्र हे प्रकरण काय आहे? नितेश राणेंच्या मनातील भळभळती जखम कोणती आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.

Bharat Mohalkar

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : हा व्हिडीओ आहे २०२१ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेचा. हा व्हिडीओ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्याला कारण ठरलंय नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलेला इशारा. बापाचा अपमान केला म्हणून मुलाने बदल्याची प्रतिज्ञा करणं हे सिनेमात पाहिलं असेल. मात्र आता सिनेमातील बदल्याची भावना थेट राजकारणात शिरलीय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंना जेवत्या ताटावरुन उठवून अटक केल्याच्या घटनेची आठवण काढत मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणेंनी थेट ठाकरेंना इशारा दिलाय. जोपर्यंत परतफेड करणार नाही तोपर्यंत तो व्हिडीओ डिलीट करणार नाही, असा इशाराच राणेंनी दिलाय. तर नितेश राणेंनाच तुरुंगात जावं लागेल, असा पलटवार अंबादास दानवेंनी केलाय.

2021 मध्ये तत्कालिन केंद्रीय मंत्री नारायण राणेंना का अटक करण्यात आली होती?

23 ऑगस्ट 2021

स्वातंत्रदिनाच्या संदर्भाने नारायण राणेंचं मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

24 ऑगस्ट 2021

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान राणेंचं संगमेश्वरमध्ये जेवण

पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वरमधून राणेंना जेवत्या ताटावरुन अटक

त्याच रात्री महाडच्या न्यायालयाकडून जामीन मंजूर

एवढंच नाही तर राणेंच्या अटकेमागे अनिल परबांचाही हात असल्याचं स्पष्ट झालं होतं

नारायण राणेंच्या अटकेचा बदला घेण्याचा इशारा नितेश राणेंनी दिलाय. तर या अटकेमागे परबांचाही हात असल्याने नितेश राणे हे परब आणि उद्धव ठाकरेंच्या अटक करुन बदला घेणार का? याकडे लक्ष लागलंय. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात रुजत असलेली बदल्याच्या राजकारणाची भाषा ही राजकीय संस्कृतिला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT