nitesh rane uday samant 
महाराष्ट्र

सभेला येताना दोन वेळचा डबा आणा; पालकमंत्र्यांना राणेंचा सल्ला

जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या आधीच सहा दिवस या सभेवरून शिमगा सुरू झाला आहे.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : जिल्हा नियोजनची सभा येत्या १६ तारखेला हाेणार आहे. ही सभा वादळी होणार असल्याचे स्पष्ट संकेत आमदार नितेश राणे यांनी आज (बुधवार) येथे दिले. नऊ महिन्यांनंतर ही सभा होत असून या सभेत पालकमंत्री उदय सामंत यांना घाम फोडणार असल्याचा इशारा नितेश राणे यांनी दिला. nitesh rane uday samant ratnagiri sindhudurg political news

नितेश राणे म्हणाले जिल्हा नियाेजनचा निधी पालकमंत्री एकट्याने वाटू शकत नाही. काेणताही निधी द्यायचा असेल तर सदस्यांच्या एकमताने देणे आवश्यक आहे. पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडून शिकण्यापेक्षा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून शिकावे. जेणेकरुन तुम्हांला नियमाने काम कसे करायचे हे समजेल. प्रत्येक बाबतीत जिल्हा परिषदेवर बाेट दाखविता, निधी वाटपात भेदाभाव करता अशा सर्व नियम बाह्य गाेष्टी समाेर आणून आम्ही आता पालकमंत्री यांना घाम फाेडणार आहाेत.

पालकमंत्री उदय सामंत यांनी या सभेला येताना दोन वेळचा डबा आणावा. हवं तर आम्ही त्यांना नाष्टा देताे. परंतु फुलपाखरु सारखे आले आणि गेले असे आम्ही चालू देणार नाही असे राणेंनी ठणकावले. जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या आधीच सहा दिवस या सभेवरून शिमगा सुरू झाला असून नेमकं या सभेत काय होणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Lifestyle : मायक्रोवेव्ह की ओव्हन, जेवण कशामध्ये शिजवता? आरोग्यासाठी काय योग्य? जाणून घ्या

दिवाळीआधी 'गुड न्यूज'! दारूपासून कीवी आणि सफरचंद होणार स्वस्त; एका कराराने भारताला मोठा दिलासा

Maharashtra News Live Update: अर्धा तासाचा पावसामध्ये भिवंडी शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी

CSK head coach : धोनीच्या चेन्नईचा हेड कोच बदलला, महाराष्ट्रातील स्टारकडे जबाबदारी

Walk According to Age: २० ते ६० वयानुसार रोज किती चालावं? जाणून घ्या आरोग्यासाठी योग्य चालण्याचं प्रमाण

SCROLL FOR NEXT