Nitesh Rane  Saam Tv
महाराष्ट्र

Nitesh Rane's Angry Reaction: 'टिल्ल्या' म्हणून संबोधल्याने राणे पवारांवर बरसले; काय म्हणाले नितेश राणे?

नितेश राणे यांची संतप्त प्रतिक्रिया

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या संभाजी महाराज धर्मवीर नाहीत या वक्तव्यावरुन राज्यात सध्या बरेच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच अजित पवारांनी काल (4 डिसेंबर) पुन्हा एकदा आपण आपल्या मतावर ठाम असल्याचं म्हटलं पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे.

यावेळी अजित पवारांना आमदार नितेश राणेंनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आले. तेव्हा अजित पवारांनी त्या टिल्ल्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांची खिल्ली उडवली. त्यावर आता नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

"लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली आणि हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टीका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही" अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे. ट्विट करत त्यांनी ही टीका केली आहे.

काय नेमकं काय म्हणाले होते?

अजित पवारांनी काल (4 डिसेंबर) पुन्हा एकदा आपण आपल्या मतावर ठाम असल्याचं म्हटलं पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे. यावेळी अजित पवारांना आमदार नितेश राणेंनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आले. त्यावेळी अजित पवारांनी टिल्ल्या लोकांनी हे सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. त्यांच्या आरोपांना पक्षाचे प्रवक्ते उत्तर देतील. असल्या लोकांच्या नादी लागत नसतो.

नितेश राणेंनी नेमकी काय केली होती टीका?

नितेश राणे ट्वीट करत म्हणाले, “आपण औरंगजेबाबाबत ‘औरंजगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असता ना?’ असं केलेलं वक्तव्य स्वाभाविकच आहे. कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे! कारण त्यांनी तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केलं नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही,” असं म्हणत नितेश राणेंनी शरद पवारांवर टीका केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : - राष्ट्रवादी शरद पवार गटाची मंडल यात्रा जालन्यात दाखल

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

Shocking : मिठाईचं आमिष दाखवतं झुडपात नेलं; अंगणवाडीत गेलेल्या ५ वर्षीय चिमुकलीवर १५ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

SCROLL FOR NEXT