Nitesh Rane Saam Digital
महाराष्ट्र

Nitesh Rane : 'अशा जिल्हात पाठवू बायकोला फोन देखील लागणार नाही'; नितेश राणेंची पुन्हा एकदा पोलिसांना धमकी

Nitesh Rane Warn Police : मस्ती कराल तर अश्या जिल्ह्यात पाठवू, बायकोला फोन देखील लागणार नाही, अशा शब्दात नितेश राणेंनी पोलीसांना दम दिला आहे. सांगलीतील पलूस येथे आयोजित जनआक्रोश मोर्चात त्यांनी हा इशारा दिला आहे.

Girish Nikam

बातमी आहे नितेश राणेंनी पोलिसांना दिलेल्या धमकीची... मस्ती कराल तर अश्या जिल्ह्यात पाठवू, बायकोला फोन देखील लागणार नाही.. अशा शब्दात नितेश राणेंनी पोलीसांना दम दिलाय.. सांगलीतील पलूस येथे आयोजित जन आक्रोश मोर्चात त्यांनी हा इशारा दिलाय. पाहूया एक रिपोर्ट...

भाजपचे आमदार नितेश राणे यांची वादग्रस्त विधान काही केल्या थांबेंनात. आता तर त्यांनी पोलिसांनाच धमकी दिली आहे. सांगलीतील जनआक्रोश मोर्चात भाषण करताना ते पुन्हा एकदा पोलिसांवर घसरलेत. लव्ह जिहादवर भाषण करताना सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही असं ते म्हणाले. पलूस येथे आयोजित शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चा दरम्यान बोलताना नितेश राणेंनी हे वादग्रस्त विधान केलंय. मात्र त्यांच्या वक्तव्याचा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी समाचार घेतलाय.

अर्ध्या तासात तक्रार घ्यायची, अन्यथा धिंगाणा घालू, असा इशारा राणेंनी दिला आहे. नितेश राणे यांनी याआधीही पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पोलिस काय करणार आहेत, हे फक्त आमचे व्हिडीओ काढतील आणि घरात जाऊन बायकोला दाखवतील असं ते म्हणाले होते. तसेच आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो असंही ते म्हणाले होते. भाजपच्या बैठकीत फडणवीसांनी नितेश राणेंना वादग्रस्त वक्तव्याबाबत तंबीही दिली होती. मात्र तरीही नितेश राणेंनी बोलताना संयम ठेवला नाही हे विशेष....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT