CM Uddhav Thackeray and Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Political News : संजय राऊत दिवाळीत जेलमध्ये जाणार, भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; उद्धव ठाकरेंवरही गंभीर आरोप

ज्याला बाळासाहेब कळले नाहीत. ज्यांच्या सोबत बाळासाहेबांनी युती केली नाही त्यांचे गोडवे आता राऊत गात आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Nitesh Rane News : संजय राऊत यांचे वेळपत्रक ठरलेले आहे. त्यांच्या कुटुंबातील एक माणूस आणि ते स्वत: दिवाळीत जेल मध्ये जाणार असे भाकित भाजप आमदार नितेश राणेंनी केले. काेविडच्या घाेटळ्यात राऊत हे जेलची हवा खाणार असल्याचे सांगत त्यांची खासदारकी राहणार नाही असेही राणेंनी म्हटले. दरम्यान पुण्यातील दंगल घडविण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (uddhav thackeray) हात असल्याचा आराेप आज (मंगळवार) आमदार नितेश राणे (mla nitesh rane latest marathi news) यांनी केला. (Maharashtra News)

माजी पाेलीस आयुक्त मीरा बाेरवणकर (Meera Borwankar) यांच्या पत्रकार परिषदेतील एका मुद्याचा धागा पकडत राणेंनी ठाकरेंवर आराेप करीत त्यांच्या चाैकशीची मागणी केली. सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत राणे बाेलत हाेते.

आमदार नितेश राणे म्हणाले बोरवणकर यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत एक मुद्दा सांगितला. ताे माध्यमांच्या लक्षात आला नाही. बाेरवणरकर यांनी मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोरे यांच्या विराेधात आमच्याकडे दंगलीबाबत पूरावा हाेता. राणे पुढे म्हणाले हे दाेघेही उद्धव ठाकरेंकडेच हाेेते. याचा अर्थ असा हाेता उद्धव ठाकरेंनीच (uddhav thackeray) त्यांना दंगल घडविणेबाबतचे आदेश दिले होते असा आराेप राणेंनी ठाकरेंवर केला.

राणे म्हणाले दंगल घडविण्यात उद्धव ठाकरेंचा हात होता. हा दुसरा पुरावा आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी आदेश दिले. त्या उद्धव ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राणेंनी केली. राणे म्हणाले उद्या राम भक्तांना काय गालबोट लागलं तर जबाबदार उद्धव ठाकरे असणार असेही राणेंनी नमूद केले.

संजय राऊत हे उबाठा सेनेची किती वाट लावणार ह्याला मर्यादा नाहीत. राऊत जेवढे थोबाड उघडणार तेव्हा उद्धव ठाकरे हे खड्ड्यात जाणार. केसरकर म्हणाल्या प्रमाणे संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे आणि मोदी भेट झाली नाही. राऊत विधानसभा अध्यक्षांवर प्रभाव टाकत आहेत. याची दखल न्यायालयाने घ्यावी असेही राणेंनी म्हटले.

राऊत यांचे वेळपत्रक ठरलेले आहे. त्यांच्या कुटुंबातील एक माणूस आणि ते दिवाळीत जेल मध्ये जाणार असे भाकित राणेंनी केले. काेविडच्या घाेटळ्यात जेलची हवा खाणार असल्याचे सांगत त्यांची खासदारकी राहणार नाही असेही राणेंनी म्हटले. हिम्मत असेल तर 24 तासासाठी संरक्षण सोड मग जुने शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचे कपडे काढून गाढवावरून धिंड काढतील असे देखील राणेंनी राऊतांना उद्देशून म्हटले.

ज्याला बाळासाहेब कळले नाहीत. ज्यांच्या सोबत बाळासाहेबांनी युती केली नाही त्यांचे गोडवे आता राऊत गात आहे. हा त्यांच्या प्रेमात पडला आहे. येणाऱ्या निवडणूकी नंतर उबाठा नावाची सेना शिल्लक राहणार नाही असे राणेंनी नमू केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

SCROLL FOR NEXT