Maharashtra fishermen ₹20,000 to ₹22,000 financial assistance during fishing ban 
महाराष्ट्र

मच्छिमारांना मिळणार थेट 20-22 हजार रुपये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government Plans Direct Financial Aid for Fishermen : मासेमारी बंद काळात पात्र मच्छिमारांना आंध्र प्रदेशच्या धर्तीवर 20 ते 22 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याचे नियोजन असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे.

Bharat Jadhav

  • आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही मदत देण्याचा विचार आहे

  • मासेमारी बंदीचा उद्देश मासळीच्या प्रजनन काळात मत्स्यसंपदेचे संवर्धन करणे हा आहे.

  • महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाकडून मच्छिमारांसाठी विविध आर्थिक व कल्याणकारी योजना राबवल्या जातात.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर राज्य सरकारने मच्छिमारांसाठी मोठी घोषणा केलीय. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मासेमारी बंद काळात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर मच्छिमारांना थेट २२ हजार रुपयांपर्यंत आर्थिक अनुदान देण्यात येणार असल्याचे सूतोवाच नितीश राणे यांनी केले आहे. यामुळे हजारो मच्छिमारांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्या काही दिवसात मुख्यमंत्री लवकरच यावर अंतिम निर्णय जाहीर करतील.

राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मच्छिमारांना संकटात मदत करण्याची घोषणा केलीय. संकट काळात मच्छिमारांना थेट आर्थिक मदत देण्याचं सूतोवाच राणे यांनी एका माध्यमाशी बोलताना केलं. माश्यांच्या प्रजनन काळात मासेमारी बंद राहते. त्यामुळे मच्छिमारांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागतं, म्हणून त्यांना दिलासा देणं सरकारचं कर्तव्य आहे. त्यामुळेच मच्छीमारांना आंध्र प्रदेशच्या धर्तीवर 20-22 हजार रुपये आर्थिक अनुदान देण्याचे नियोजन आहे. त्याबाबतचा निर्णय लवकच जाहीर करण्यात येणार असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलंय.

शेतकऱ्यांना दिलासा देणार

राज्यात काही भागात निश्चितपणे पाऊस कमी पडलाय. ही चिंतेची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सरकारची भूमिका सांगत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी येत्या 5 ऑक्टोबरपासून पंचनामे सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना शेतात जाऊन पाहणी करण्याचे निर्देश

राज्यात दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीत सर्व विभागांना तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर सर्वच विभाग कामाला लागले आहेत. या विभागांकडून अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनाही शेतात जाऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल

लालबाग मंडळाची VIP संस्कृती पुन्हा वादात, भाविकांना धक्काबुक्की, व्हीआयपींना लोटांगण

शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत 'या' ३ योजना; सरकार देते तब्बल ५ पाच लाखांचं कर्ज, वाचा संपूर्ण माहिती

साडेचार लाखांचा आयफोन भारतात, कारच्या किंमतीत फोन, तरीही खरेदीसाठी झुंबड

कारमध्ये चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू, बंद कार मुलांसाठी मृत्यूचा सापळा

SCROLL FOR NEXT