kokan railway 
महाराष्ट्र

कोकण रेल्वेचेही खासगीकरणं; ६९ स्थानकांचा ताबा ठेकेदारास?

संभाजी थोरात

नॅशनल मॉनिटायझेशन पाइपलाइन (एनएमपी) national monetization pipeline म्हणजे सरकारी मालमत्ता विकून रोखीकरण करणे.

काेल्हापूर : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन Nirmala Sitharaman यांनी माॅनिटायझेशनच्या मालमत्ता निश्चित केल्या आहेत. यामध्ये काेकण रेल्वे kokan railway मार्गाचा सुमारे ७५६ किलाेमीटर अंतराचा समावेश आहे. यामधून शासनास ७२८१ काेटी रुपये मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान यामुळे प्रवासी रेल्वेसारख्या सुविधांचे खासगीकरण हाेईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

काेविड १९ मुळे शासनाची तिजाेरीत सातत्याने खडखडाट हाेत आहे. काेविडच्या पहिल्या लाटेपेक्षा दुस-या लाटेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला माेठा फटका बसला. परिणामी सरकारला पायाभूत प्रकल्प पुर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासत आहे. त्यामुळे माॅनिटायझेशन सारखी प्रक्रिया अंमलात आणून सरकारी मालमत्तांचे खासगीकरण करण्यात येत आहे.

नीती आयोगाच्या अहवालानूसार राष्ट्रीय महामार्गापासून काही महत्वाच्या प्रकल्पांची सरकार विक्री करणार आहे. आपलीच एक मालमत्ता विकून दुसरी मालमत्ता उभारण्यासाठीचा सरकारचा हा प्रयत्न आहे. यामध्ये विमानतळ, रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे.

यामध्ये कोकण रेल्वेतील ६९ स्थानकांचा ताबा ठेकेदाराकडे जाणार आहे. त्यातून केंद्र सरकारला ७२८१ कोटी रुपये मिळणार असल्याची दाट शक्यता वर्तवली आहे. दरम्यान मॉनिटायझेशनमध्ये २६ टक्के रेल्वेचा वाटा असेल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT