शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंनी पोलिसांच्या उपस्थितीत स्टिंग ऑपरेशन करत भाजपची पोलखोल केलीय... भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकरांच्या घरावर धाड टाकत निलेश राणेंनी पैशांची बॅगच समोर आणलीय... एवढंच नाही तर निलेश राणेंनी ज्यांच्या घरात पैसे आढळले त्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी काय संबंध आहेत? हेच उघड करुन सांगितलंय...
या प्रकरणी निलेश राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यानंतरच पैसे वाटप सुरु झाल्याचा खळबळजनक आरोपही केलाय.. तर निलेश राणे काँग्रेससारखा आरोप करत आहेत.. त्यांनी नारायण राणेंचा आदर्श घ्यावा, असं टोला रवींद्र चव्हाणांनी लगावलाय. दुसरीकडे भाजपनं मात्र हमाम में सब नंगे है म्हणत निलेश राणेंना मंत्री नितेश राणेंनी प्रतिआव्हान दिलंय.. तर महायुतीतच संघर्ष पेटल्यानं आता ठाकरेसेनेच्या हाती आयतं कोलित मिळालंय.. भाजप निवडणुकीत पैसे वाटतो, हेच निलेश राणेंनी दाखवून दिल्याचं म्हटलंय..
सिंधुदुर्गमध्ये पालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि शिंदेसेनेत संघर्ष सुरू असल्याचं दिसत असलं तरी यामुळे राणे बंधू आपापल्या पक्षांसाठी थेट एकमेकांना भिडले आहेत. सत्ता कुणाची येणार ते मतदार ठरवणार. मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं राणे कुटुंबातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय एवढं मात्र खरं....आता वाद निवडणुकीनंतर तरी थांबणार की तो पुढच्या काळातही अशीच भाऊबंदकी सुरू राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.