2657 teacher posts vacant in Ahilyanagar Zilla Parishad schools saam tv
महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा दुष्काळ? शिक्षकांच्या २,६५७ रिक्त पदांवरून खासदारांचं शाळेच्या आवारात उपोषण सुरु

2657 Teacher Posts Vacant In Ahilyanagar Zilla Parishad schools: अहिल्यानगर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या २,६५७ रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित करत खासदार निलेश लंके यांनी उपोषण सुरू केले आहे.

Omkar Sonawane

सचिन बनसोडे, साम टीव्ही

अहिल्यानगर: जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची हजारो पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण सुरू केले आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, प्राथमिक व पदवीधर शिक्षक संवर्गातील ४७१, माध्यमिक विभागातील २,०५४, तर प्राथमिक विभागातील मुख्याध्यापकांची १३२ पदे रिक्त आहेत. म्हणजेच जिल्ह्यात एकूण २,६५७ पदे रिक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.

एका शिक्षकामागे २० विद्यार्थी गृहीत धरल्यास या रिक्त पदांचा थेट परिणाम ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे लंके यांनी म्हटले आहे.एकीकडे शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असताना, दुसरीकडे कार्यरत शिक्षकांवर बीएलओ ड्युटी, मतदार यादी पुनरीक्षण, जनगणना, विविध शासकीय सर्वेक्षणे, ऑनलाइन पोर्टलवर माहिती भरणे, आधार कार्ड व बँक खाते नोंदी, पोषण आहार आणि आरोग्य नोंदी यांसारख्या अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचा अध्यापनाचा महत्त्वाचा वेळ कागदोपत्री कामांमध्ये जात असून, त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्यात यावीत, त्यासाठी मुदतीसह कालबद्ध कृती आराखडा आणि शाळानिहाय अंतिम यादी जाहीर करावी, तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून पूर्णपणे मुक्त करावे, या प्रमुख मागण्यांसाठी लंके यांनी उपोषण सुरू केले आहे.

मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार, असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला आहे उपोषणस्थळी खासदार लंके यांच्यासह त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banan Benefits: सकाळी रिकाम्या पोटी केळी खावी की नाही? जाणून घ्या हे ७ फायदे आणि परिणाम

Maharashtra News Live Update: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT