इस्लामपुरात 16 लाखांचे कोकेन बाळगणाऱ्या नायजेरीयन तरुणाला अटक Saam TV
महाराष्ट्र

इस्लामपुरात 16 लाखांचे कोकेन बाळगणाऱ्या नायजेरीयन तरुणाला अटक

न्यायालयाने त्याला 1 जानेवारी पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या वाळवा तालुक्यातील पेठनाका येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून १६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे कोकेन अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणारा नायजेरियन तरुण एडवर्ड जोसेफ इदेह ३५  नायजेरिया, सध्या तो बेंगलोर येथे राहतो, याला इस्लामपूर पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे १६४ ग्रॅमच्या कोकेन कॅप्सुल मिळून आल्या आहेत. न्यायालयाने त्याला १ जानेवारी पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये एक संशयीत कोकेन अंमली पदार्थ घेवून जात असल्याची माहिती मिळाली. रविवारी रात्री पोलिसांनी (Police) पेठनाका येथील न्यु मणिकंडन हॉटेल जवळ सापळा लावला. पुणे ते बेंगलोर जाणाऱ्या शर्मा ट्रॅव्हल्समधून जात होता. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या काळ्या रंगाच्या सॅकमध्ये एक सनसिल्क ब्लॅकशाईन शाम्पूची ६५० मिली मापाची काळया रंगाची बाटली आढळून आली. त्यामध्ये कोकेन अंमली पदार्थाच्या १५ कॅप्सुल मिळून आल्या. हे कोकेन सुमारे १६ लाख ३० हजार रुपये किंमतीचे आहे, त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तर २५ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वाघवाडी फाटा येथे बसने मुंबई ते बेंगलोर प्रवास करीत ११ लाख रुपयांचे कोकेन घेवून जाणाऱ्या टांझानियाच्या तरुणास पोलीसांनी जेरबंद केले होते. त्याच्याकडे १०९ ग्रॅम कोकेन मिळाले होते. दरम्यान एका महिन्याच्या अंतरात हा दुसरा परदेशी तरुण कोकेन घेवून जाताना पोलीसांच्या जाळ्यात सापडला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Mugdha-Prathamesh : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या घरी आला नवा पाहुणा, VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात मकरसंक्रांतीला ₹३००० जमा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच विषय संपवला

Jio Netflix offer: आता Netflix चा आनंद फुकटात मिळणार, Jioची धमाकेदार ऑफर, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT