Popular Front of India: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) या संघटनेशी संबंधित अनेक संस्था आणि कार्यलयांवर NIA आणि ED ने काल रात्रीपासून देशभरात छापेमारीचा धडाका लावला आहे.
PFI ही संघटना दहशतवाद्यांना पैसा पुरवत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे या संस्थेच्या भारतातील विविध कार्यालयांवर NIA आणि ED ने जवळपास १० राज्यांमध्ये छापेमारी करत संस्थेतीन १०० च्यावर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.
देशभरात एकूण १०६ जणांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून यामध्ये महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश आहे. काल बुधवारी रात्रीपासून NIA ने राज्यभरात केलेली छापेमारीच्या कारवाया खालीलप्रमाणे -
पाहा व्हिडीओ -
पुणे -
पुण्यात (Pune) कोंढवा, हडपसरसह विविध ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत. कोंढवा भागातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते रझी खान तपास यंत्रणांच्या ताब्यात घेण्यात आलं आहे.
नाशिक -
मालेगाव शहरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे. जिल्हाध्यक्ष मौलाना सैफुर रहमान यांना मालेगाव शहरातून त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. ही कारवाई एटीएस आणि NIA ने एकत्रित कारवाई केली. या छाप्यात घरातील काही साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
कोल्हापूर -
कोल्हापूरमधील (Kolhapur) जवाहरनगर परिसरात कारवाई. छापेमारीत PFI चे पदाधिकारी अब्दुल मौला याला सिरत मोहल्ला येथून घेतलं ताब्यात. छाप्यादरम्यान कमालीची गुप्तता.
औरंगाबाद -
औरंगाबाद शहरातील बायजीपुरा, नॅशनल कॉलनीत कारवाई. शहरातून PIF च्या 3 सदस्यांना ताब्यात घेतलं. सय्यद फैसल राहणार नॅशनल कॉलनी, शेख इरफान, माजी जिल्हाध्यक्ष PFI प्रमुख आणि परवेझ खान हे दोघे बायजीपूरा येथील रहिवासी आहेत.
पुण्यात कसा होता छापेमारीचा घटनाक्रम ?
काल बुधवार रात्री २ पासून कारवाईला सुरुवात. कोंढवा येथील शाळेत असणाऱ्या PFI च्या कार्यालयाजवळ एटीएस आणि NIA च्या टीम एकत्र आल्या. कारवाई दरम्यान, स्थानिक पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. कोंढवा परिसरातील उर्दू आणि इंग्रजी शाळांमध्ये PFI च्या बैठका पार पडत असल्याची माहिती हाती आली आहे.
NIA, ED आणि राज्य पोलिसांची PFI विरुद्ध देशभरातील छापेमारी खालीलप्रमाणे -
भारतात 106 ठिकाणी छापेमारी -
महाराष्ट्रात 20
कर्नाटकात 20
केरळमध्ये 22
तामिळनाडू 10
आसाम 6
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.