Crime News Saam tv
महाराष्ट्र

किरण लोखंडे मृत्यू प्रकरणा: पत्नीनेच केला पतीचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी केले भयंकर कृत्य

पत्नी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लक्ष्मण सोळुंके

जालना - शहरातील अंबड (Ambad) रोडवरील अर्चना नगर परिसरात ३० ऑगस्टच्या रात्री नऊच्या सुमारास व्यवसायाने वकील असलेल्या किरण लोखंडे यांचा स्वयंपाक घरात आग लागून गॅसचा स्फोट झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेने शहरात एकच खबळ उडाली होती.

या प्रकरणी मनीषा लोखंडे यांच्या माहिती वरून तालुका पोलीस ठाण्यात अपघात प्रकरणी नोंद करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात आठ दिवसानंतर तालुका पोलिसांनी मनीषा लोखंडे हिनेच अज्ञात कारणाने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत्यूदेह जाळण्यासाठी गॅसचा स्फोट झाल्याचा बनाव केल्याचा आरोप ठेवत खुनाचा गुन्हा दाखल केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान तीन महिन्यापूर्वीच किरण लोखंडे यांचा विवाह मनिषा हिच्या सोबत झाला होता.या घटनेची माहिती मिळताच अग्निशान विभागाच्या जवानांनी घरातील आग विझवत गॅस पाईप कंपन्यात आल्याने आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. गॅस कंपनी कडून ही पाईप कापल्याने आग लागली असल्याची शक्यता वर्तवत कुठल्याही प्रकारचा टाकीचा स्फोट झाला नसल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता.

या प्रकरणी किरण लोखंडे यांच्या नातेवाईका कडून घातपाताचा संशय व्यक्त केल्या जात होता. मनीषा लोखंडे हिच्यावर ही संशय व्यक्त केल्या जात होता.या प्रकरणी वकील महासंघाकडून आणि मराठा महासंघाकडून किरण लोखंडे यांचा खून करून अपघात घडून आणल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी पोलिस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली होती.

या प्रकरणी पोलिसांनी सबळ पुराव्याचा बारकाईने निरीक्षण करून त्या आधारे अज्ञात कारणावरून किरण लोखंडे यांचा खून त्यांची पत्नी मणीषा लोखंडे हिनेच करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत्यूदेह जाळण्यासाठी गॅसचा पाईप काढूनआग लावून गॅसचा स्फोट झाल्याचा बनाव केल्याचा आरोप ठेवत किरण लोखंडे यांच्या पत्नीविरोधात तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपी मनीषा लोखंडे ला ताब्यात घेऊन या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून खुनाच्या कारणाचा शोध पोलिस घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Dipke: शिवीगाळाचं समर्थन नाही; पण FIR सुद्धा योग्य नाही, अभिजीत दिपके स्पष्ट बोलला

Heart-Brain Health : निरोगी हृदय, तल्लख मेंदू! आजपासूनच करा 'हे' सोपे उपाय, हार्ट अटॅकचा धोका टळेल

Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज वाढ झाली की घसरण? वाचा तुमच्या शहरातील दर

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात लवकरच होणार वाढ, 'या' महत्त्वाच्या तारखा नोट करा

SCROLL FOR NEXT