पुर्णा तालुका हळहळला; नवविवाहीत पती- पत्नीची विष पिऊन आत्महत्या, कारण...
पुर्णा तालुका हळहळला; नवविवाहीत पती- पत्नीची विष पिऊन आत्महत्या, कारण...  Saam TV
महाराष्ट्र

पुर्णा तालुका हळहळला; नवविवाहीत पती- पत्नीची विष पिऊन आत्महत्या, कारण...

राजेश काटकर

परभणी : अगदी आठ महिन्यापूर्वी सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये झालेला विवाह या विवाहानंतर सुखी संसाराची वाटचाल सुरू असताना अचानक दोघांनीही सामुहिक रित्या जीवन संपण्याचा केलेला प्रयत्न हा सर्वांसाठी चटका लावणारा आहे. ही घटना पूर्णा तालुक्यातील (Purna Taluka) पूर्णा ते झिरो फाटा रस्त्यावरील कात्नेश्वर गावात घडली असून शनिवार दिनांक आठ जानेवारीच्या रात्री या गावातील एका पती-पत्नीने आपल्या राहत्या घरीच विषारी औषध पिऊन जीवन यात्रा संपवली आहे. याप्रकरणी पूर्णा पोलीस (Purna Police) स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Parbhani Purna Taluka Suicide Case)

कातनेश्वर येथील मयत युवक गंगाधर विश्वनाथ चापके (वय वर्ष 25) याचा मागील आठ महिन्यापूर्वी पिंपळगाव कुठे येथील सपना या युवतीशी विवाह संपन्न झाला होता. दरम्यान आठ महिन्यानंतर विवाह झाल्यानंतर विवाहाची सुखी संसाराची वाटचाल सुरू असतानाच दिनांक 8 जानेवारी रोजी शनिवारी रात्री आपल्या राहत्या घरी या कुटुंबातील गंगाधर विश्वनाथ चापके त्याची पत्नी सपना विश्वनाथ चापके (वय 22 वर्ष) दोघांनी जेवण केले व आपल्या खोलीमध्ये झोपले होते परंतु मध्यरात्री त्यांनी दोघांनी विषारी औषध प्राशन केले. दरम्यान सकाळी सपना व गंगाधर झोपेतून उठत नसल्यामुळे जवळच्या नातेवाईकांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता दोघीही मृत अवस्थेमध्ये घटनास्थळी आढळून आले. दरम्यान या घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना देण्यात आली. (Parbhani Latest News In Marathi)

दिनांक 9 जानेवारी सकाळी आठच्या दरम्यान पूर्णा पोलीस निरीक्षक सुभाष मारकड, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाले, घाटे अर्जुन रणखांब, विष्णू भोसले, कांबळे सहकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला व प्रेत ताब्यात घेऊन पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये शवविच्छेदनासाठी दाखल केले. दरम्यान शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान या दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणी पूर्णा पोलीस स्थानकात कलम 174 (2) 2022 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पूर्णा पोलीस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Kolhapur Lok Sabha | कोल्हापूरचा आखाडा कोण जिंकणार?

OTT Release Date: थ्रिलर अन् ॲक्शनपटाची यंदाच्या आठवड्यात प्रेक्षकांना मेजवानी, जाणून घ्या चित्रपट, वेबसीरीजची यादी

Special Report : क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने 11 वर्षीय मुलानं गमावला जीव

Today's Marathi News Live : शिक्षकाच्या मुलाला हरवण्यासाठी पंतप्रधान मैदानात, हाच माझा विजय - निलेश लंके

Jitendra Awhad News | Jitendra Awhad News | एकनाथ शिंदेंना मी ठाणं दाखवलं, म्हस्के नारायण राणेंसोबत पळून जाणार होते - आव्हाड

SCROLL FOR NEXT