प्रांताधिकाऱ्या सह सरपंचाला 5.50 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

प्रांताधिकारी आणि सरपंच एकाच वेळी लाचलुचपत च्या जाळ्यात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सरपंच संदीप ढवण आणि प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधान
सरपंच संदीप ढवण आणि प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधानSaam TV

कोल्हापूर: कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मोठी कारवाई केली आहे. साडे पाच लाखांची लाच स्विकारताना प्रांताधिकाऱ्या सह सरपंचाला रंगेहात पकडलं आहे. राधानगरी चे प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधान यांच्या सह फराळे गावचे सरपंच संदीप ढवण लाचलुचपत च्या जाळ्यात सापडले आहे. वाळू सिल्क वॉशिंग प्लांट वरील नोटीस मागे घेण्यासाठी पाच लाखांची लाच मागितल्याचं उघड झाले आहे. प्रांताधिकारी आणि सरपंच एकाच वेळी लाचलुचपत च्या जाळ्यात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com