Dombivli News Saam Tv
महाराष्ट्र

Dombivli News: नवंवर्ष स्वागत यात्रा उत्साहात होणार; गुढीपाडव्याआधी आठवडाभर होणार जनजागृतीपर कार्यक्रम

Dombivli News: गुढीपाढव्या निमित्त डोंबिवलीमध्ये आठवडाभर कार्यक्रम केले जाणार आहेत. यंदा नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथसाठी रामराज्य आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये हा विषय देण्यात आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अभिजीत देशमुख)

Gudi Padava Dombivli Awareness Program:

डोंबिवलीची ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराचे १०० वे वर्ष असून स्वागत यात्रेचे २६ वे वर्ष आहे. गुढीपाडवानिमित्त स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ डोंबिवलीतून रोवली गेली. त्यानंतर राज्य नव्हे तर देशभरात स्वागतयात्रेची परंपरा सुरू झालीय. डोंबिवलीच्या स्वागतयात्रेची राज्यातच नव्हेतर देशभरात उत्सुकता असते. यंदा ४ एप्रिलपासून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. (Latest News)

यंदा नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथसाठी रामराज्य आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये हा विषय देण्यात आलाय. या स्वागत यात्रेत ६५ पेक्षा जास्त चित्ररथ आणि त्याहून जास्त डोंबिवलीतील नामांकित संस्था या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत.

स्वागत यात्रेच्या निमित्ताने गीता पठण ,महिला पुरुषांसाठी भजन स्पर्धा ,महिलांसाठी फ्लॉवर डेकोरेशन ,ज्येष्ठ नागरिकांसाठी अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहा एप्रिलपासून कार्यक्रम सुरू होणार असून श्रीसूक्त पठण ,दीपोत्सव ,७ एप्रिल रोजी श्रीगणपती अथर्वशीर्ष पठण ,सायंकाळी बाईक रॅली ,श्री गणपती अथर्वशीर्ष पठण ,तसेच संस्कारभारतीतर्फे महारांगोळी , ८ एप्रिल रोजी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन ,त्यानंतर दिलखुलास उज्वल निकम या विषयावर ज्येष्ठ विधितज्ञ एड उज्वल निकम यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे घेणार आहेत.

यंदा नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथसाठी रामराज्य आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये हा विषय देण्यात आला असून ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता श्री गणरायाची महापूजा त्यानंतर पालखीपूजन होईल त्यानंतर पालखी भागशाळा मैदानात नेण्यात येणार.

तेथून स्वागत यात्रा सुरू होईल, ती पावणे करा वाजण्याच्या सुमारास अप्पा दातार चौक येथे स्वागत यात्रेचा समारोप होणार आहे. यंदा डोंबिवली गणेश मंदिर संस्थानचे १०० वे वर्ष आणि रौप्यमहोत्सवी सांगता सोहळा हा दुग्धशर्करा योग लाभलेल्या गणेश मंदिराची स्वागत यात्रा स्मरणीय व्हावी यासाठी यंदा गणेश मंदिर संस्थानच्या वतीने अल्प दरात आरोग्य सुविधा केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत गणेश मंदिर संस्थानाचे अध्यक्षा अलका मुतालिक, प्रवीण दुधे आणि संयोजन समिती अध्यक्ष मुंडे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT