Express  Saam tv
महाराष्ट्र

Rahuri to Shani Shingnapur : मोठी बातमी! राज्यात आणखी एका रेल्वे मार्गाला मान्यता, ४९४ कोटी रुपयांचा खर्चही मंजूर

Rahuri to Shani Shingnapur Latest News : राज्यात आणखी एका रेल्वे मार्गाला मान्यता मिळाली आहे. या मार्गासाठी ४९४ कोटी रुपयांचा खर्चही मंजूर झाला आहे.

Vishal Gangurde

राज्यात आणखी एक रेल्वे मार्गाला मान्यता मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयाने राहुरी ते शनी शिंगणापूर दरम्यान नवीन रेल्वे मार्गाला मान्यता दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग असणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिलीये. ४९४.१३ कोटी रुपयांचा खर्च या मार्गासाठी मंजूर करण्यात आला आहे.

शनी शिंगणापूरला दररोज ३०,००० ते ४५,००० भाविक ये-जा करतात. शनी शिंगणापूर राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळ असून या मार्गाला थेट रेल्वे जोडणीचा अभाव आहे. या तयार होणाऱ्या मार्गामुळे आध्यात्मिक केंद्रापर्यंत पोहोचणे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या मार्गामुळे यात्रेकरू आणि पर्यटकांची, विशेषतः राहुरी आणि जवळच्या भागातील लोकांचा प्रवास सुरळीत होईल.

राहुरी ते शनी शिंगणापूर या रेल्वे मार्गावर शिर्डी, राहु-केतू मंदिर (राहुरी), मोहिनी राज मंदिर (नेवासा) आणि पैस खांब करवीरेश्वर मंदिर (नेवासा) यासारख्या इतर धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत. या धार्मिक आणि पर्यटना स्थळांना देखील फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

या प्रकल्प अहवालात (डीपीआर) दररोज चार जोड्या प्रवासी गाड्यांचा प्रस्ताव आहे. यामध्ये अंदाजे वार्षिक प्रवासी संख्या १८ लाख असेल. शनी शंगणापूर हे आध्यात्मिक केंद्र आहे. या केंद्राकरीता ही पायाभूत सुविधा आणि दळणवळण सुधारण्यासाठी हा विकास एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT