Union Home Minister Amit Shah|Sanjay Raut Saamtv
महाराष्ट्र

Sanjay Raut: बाळासाहेब ठाकरे अमित शहांना ओळखतही नव्हते, मोदींमुळे मदत केली; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Rauts Claim by latest Narkatla Swarg Book: बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोघांनीही, अमित शहांना ओळखत नसतानाही त्यांना कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली होती, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Bhagyashree Kamble

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे अमित शहा यांना ओळखतही नव्हते, तरी देखील त्यांना मदत केली, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातून केला आहे. बाळासाहेब ठाकरेंनीच गोध्रावेळी नरेंद्र मोदींना वाचवलं होतं, हे सर्वश्रृत आहे, तसेच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोघांनीही, अमित शहांना ओळखत नसतानाही त्यांना कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली होती, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, '२५ वर्षांपूर्वी अमित शहा हे मुंबईत मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ्यायला आले होते. याबाबत आताच्या भाजप नेत्यांना काहीच माहित नाही. त्यावेळी शरद पवार यांनी अमित शहांना मदत केली होती. पुस्तक तयार झाल्यानंतर मी शरद पवारांकडे गेलो. त्यांना हे पुस्तक दिलं. त्यांना मी सांगितलं की, काही बाबी पुस्तकात नमुद केल्या आहेत. तेव्हा पवार यांनी, अमित शहा यावर काय प्रतिक्रिया देतील हे पाहायला हवं', असा खुलासा संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत पुढे म्हणाले, 'त्या काळात नरेंद्र मोदींनी वारंवार शरद पवार यांच्याशी संपर्क साधला होता आणि अमित शहांसाठी मदतीची विनंती केली होती. माझ्या माहितीनुसार, तेव्हा पवारांनी विचारलं होतं, हा कोण? त्यावर मोदी म्हणाले होते, माझा विश्वासू- कामाचा माणूस आहे. बाळासाहेबही अमित शहांना ओळखत नव्हते. त्या काळात अमित शहा हे केवळ आमदार होते. बाळासाहेबांनी शहांचा फोटो पाहिला आणि तेव्हा मला विचारलं होतं की आपण याच माणसाला मदत केली होती ना?" अशी आठवण राऊतांनी सांगितली.

मोदींबाबत अनेक खुलासे करत राऊत म्हणाले, 'बाळासाहेबांनीच गोध्रावेळी मोदींना वाचवलं होतं. त्याकाळी भाजपमध्ये नरेंद्र मोदींना हटवण्याचा विचार सुरू होता. त्यावेळी अडवाणींनी बाळासाहेब ठाकरेंना मुंबईतील महापौर बंगल्यावर सांगितले की मोदींना बदलायचं आहे. मात्र बाळासाहेबांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, 'ही वेळ मोदींना बदलण्याची नाही. सध्या हिंदुत्वाची लाट आहे आणि मोदींच्या भोवती ती केंद्रित आहे. त्यांना हटवणे म्हणजे हिंदुत्वाशी द्रोह ठरेल. त्यामुळे गुजरात आपल्या हातून जाईल.' असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वालाही बाळासाहेबांचे मत मान्य करावे लागले. तेव्हाच मोदींच्या पुढील प्रवासाला वेग आला होता." असा दावा संजय राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचे दर्शन पूर्ववत सुरू

Health tests before joining gym: तरूणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; जीममध्ये व्यायाम करण्यापूर्वी आरोग्याच्या 'या' टेस्ट करून घ्याच

Smartphone Launch: नवा POCO M7 Plus भारतात लाँच, ७०००mAh बॅटरीसह मिळेल ५०MP कॅमेरा, किंमत किती?

Pune: पोलिस उपनिरीक्षकाची हप्तेखोरी, हॉटेल व्यवसायिकाला धमकावत पैसे उकळले; CCTV VIDEO व्हायरल

Janmashtami 2025: श्री कृष्ण जन्माष्टमीला या चूका करू नका, संकटात सापडाल

SCROLL FOR NEXT