Crime News in bhandara SAAM TV
महाराष्ट्र

Nashik Crime News: धक्कादायक! दारू पिल्याने ओरडा मिळाला; संतापलेल्या भाच्याने मामाला कायमचं संपवलं

Nephew killed uncle: शुक्रवारी दुपारच्या सुमारास मामाने त्याला म्हटलं की, 'तुझ्या मुलाच्या पायाला चटका लागला आहे, त्याला दवाखान्यात उपचारासाठी तुझ्याकडे पैसे नाही. पण दारू प्यायला पैसे आहेत.'

Ruchika Jadhav

Nashik News:

भाच्याने मामाचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या (Nashik) पंचवटी परिसरातून समोर आली आहे. दारूवरून मामाने भाच्याला सुनावल्याने त्याने रागाच्या भरात थेट मामाला संपवलंय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. पोलिसांनी आरोपी भाच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बाबुलाल सोमा गावित असं मृत मामाचं नाव आहे. ते गेल्या २ महिन्यांपासून पंचवटीतील हिरावाडी परिसरात आपला भाचा मच्छिन्द्र माणभावकडे राहत होते. मच्छिन्द्रच्या मुलाला पायाला चटका लागला आहे.

त्यावरून शुक्रवारी दुपारच्या सुमारास मामाने त्याला म्हटलं की, 'तुझ्या मुलाच्या पायाला चटका लागला आहे, त्याला दवाखान्यात उपचारासाठी तुझ्याकडे पैसे नाही. पण दारू प्यायला पैसे आहेत.'

मामा असं बोलल्याचा मच्छिन्द्रला राग आल्याने त्याने घरातील पलंगावर बसलेल्या आपल्या मामाला खाली जमिनीवर आपटले. तसेच प्लास्टिकची झाडाची कुंडी मामाच्या छातीत मारुन फेकली. या घटनेत मामा गंभीर जखमी झाला. यात मामाचा काही वेळातच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे हा मृतदेह शुक्रवारी दिवसभर घरातच ठेवण्यात आला होता.

पोलीसांकडे (Police) तक्रार देण्यासही कोणी पुढे येत नव्हते. अखेर शनिवारी पोलिसांनी मृत मामाला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि रविवारी शव विच्छेदन अहवाल प्राप्त होताच मच्छिन्द्र विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. तसेत त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital dating: देशातील 148% विवाहित महिला करतात बाहेर लफडं! एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंगची कारणं ऐकून थक्क व्हाल

Bank Jobs: सरकारी बँकेत नोकरीची संधी; १००० पदांसाठी भरती; पगार ८५९२० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Mumbai Tourism: दूर कशाला या विकेंडला मुंबईतच फिरा! ठिकाणंही अगदी बजेट फ्रेंडली

Ananya Panday: बे इज बॅक; अनन्या पांडेने केला लूक चेंज, पाहा ग्लॅमरस फोटो

SCROLL FOR NEXT