NEET UG Paper Leak Saam Digital
महाराष्ट्र

NEET UG Paper Leak संदर्भात सुनावणी पुढे का ढकलली? सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ३ प्रमुख कारणे काय आहेत? वाचा सविस्तर

Reason why Supreme Court on hearing on NEET paper got postponed: नीट संदर्भात आजची सुप्रीम कोर्टातील सुनावणी टळली आहे. पुढील सुनावणी १८ जुलैला होणार आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणाऱ्या नीट परीक्षेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती.

Sandeep Gawade

देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणाऱ्या नीट परीक्षेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. आजच्या निर्णयाकडे देशभरातली विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र पढील आठवड्यापर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. पेपर लीक प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं.

काय आहेत कारणं?

केंद्र आणि NTA ने काल रात्री उत्तर दाखल केले आहे, त्या उत्तराची प्रत काही पक्षांना मिळालेली नाही

त्या पक्षांना ही उत्तरे पाहण्यासाठी आणि उलटतपासणीसाठी तयार होण्यासाठी वेळ हवा आहे

त्यामुळे वकिलांशी चर्चा करून 18 जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतला

नीट पेपरफुटीसंदर्भात एक मोठं अपडेट समोर आलंय. नीट पेपरफुटी झालीच नाही, असा दावा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केला होता. यासंदर्भात केंद्राने कोर्टात प्रतिज्ञापत्र देखील सादर केलं होतं. विद्यार्थ्यांच्या गुणांमधील तफावत ही अभ्यासक्रम कमी केल्यामुळे झाली असल्याचं केंद्र सरकार म्हटलं आहे. २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला म्हणून मार्क वाढल्याचा दावा केंद्राने केलाय. पेपरफुटी संदर्भात आयआयटी मद्रासची मदत घेण्यात आली (NEET UG 2024) होती.

एनटीएने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण १५३ अनियमितता प्रकरणे समोर आली आहेत. समितीच्या शिफारशीवर आधारित ८१ उमेदवारांचे निकाल रोखण्यात आले आहेत. ५४ उमेदवारांना ३ वर्षांसाठी परीक्षेला बसण्यास अपात्र घोषित करण्यात आलंय. टेलिग्रामवर पेपरफुटी झाल्याचा दावा खोटा आहे. फेक व्हिडीओ तयार करण्यात आल्याचं एनटीएने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Government Scheme: या सरकारी योजनेत लाडक्या बहिणींना मिळतात २ लाख रुपये; मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT